नागपूर,
SIR Registration Camp पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांना एसआयआर नोंदणी प्रक्रिया सुलभ व्हावी, या उद्देशाने प्रेस क्लबमध्ये आयोजित दोनदिवसीय एसआयआर नोंदणी शिबिराचा गुरुवारी उत्साहात प्रारंभ झाला. या शिबिरामुळे पत्रकारांना आवश्यक शासकीय सेवांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध होत आहे.
उद्घाटनप्रसंगी महानगरपालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर, प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र, नगरसेवक सुनील हिरणवार, नगरसेविका धनश्री देशपांडे, पूजा पाठक तसेच प्रभागातील बीएलओ उपस्थित होते. एसआयआर हा राष्ट्रीय महत्त्वाचा उपक्रम असून त्याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी शासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधी, पत्रकार आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागाची आवश्यकता असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.हे शिबिर ६ व ७ ऑगस्ट रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत प्रेस क्लब येथे सुरू राहणार आहे. नोंदणीदरम्यान कोणतीही अडचण आल्यास तत्काळ संपर्क साधण्याचे आवाहन नगरसेवक सुनील हिरणवार व नगरसेविका धनश्री देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ज्येष्ठ पत्रकार भूपेंद्र गणवीर यांनी केले. यावेळी अनुपम सोनी, पारितोष प्रामाणिक, सनी शेंडे, रणजित देशमुख, पत्रकारांसाठी एसआयआर नोंदणी शिबिर सुरू आदी उपस्थित होते.
सौजन्य:देवराव प्रधान,संपर्क मित्र