नागपूर,
Swar Sadhana Musical Group स्वर साधना म्युझिकल ग्रुपतर्फे शनिवार, ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात ‘तेरी यादें’ या संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले आहे. मोहम्मद रफी, किशोर कुमार, मुकेश, महेंद्र कपूर, लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या स्मृतींना अभिवादन करत मराठी व हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.
यावेळी डॉ. नवीन कुलकर्णी, डॉ. हरीभाऊ डोर्लीकर तसेच प्रशांत व जानकी कुलकर्णी आरोग्य, मानसिक स्वास्थ्य आणि आर्थिक नियोजन या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन शारदाताई इटनकर व प्रशांत कुलकर्णी यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत राजे मुधोजी भोसले, महापौर निताताई ठाकरे व प्रफुल्ल गुढघे-पाटील उपस्थित राहणार आहेत. अनेक गायक-कलाकारांच्या सहभागाने रंगणाऱ्या या कार्यक्रमाचे संयोजन मधुकर गुंडलवार यांनी केले आहे.
सौजन्य:विजय दाणी,संपर्क मित्र