लाखांदूर,
cigarette at school इकडे विद्यार्थ्यांच्या पोटात जंक फूड जाऊ नये म्हणून, अन्न औषध प्रशासन विभागाचे आयुक्त कठोर निर्णय घेतात. तर दुसरीकडे शाळेच्या आवारातच विद्यार्थी धूम्रपान करून पूर्ण व्यवस्थेलाच आव्हान देतात. लाखांदूर येथील जिल्हा परिषद हायस्कूल मधील हा प्रकार चिंता वाढविणारा असून, या विद्यार्थ्यांनी केवळ धुम्रपान करून थांबले नाहीत तर दुसऱ्या विद्यार्थ्याच्या तोंडात धुवा टाकून खोडसाळपणाही केला. त्यामुळे तो विद्यार्थी आजारी पडला. प्रतीक धर्मदास तांदुळकर (११) रा. कन्हाळगाव असे इयत्ता सहाव्या वर्गातील पिडित विद्यार्थ्याचे नाव आहे.
लाखांदूर येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथे प्रतीक शिक्षण घेत आहे. प्रतीकचे आई-वडील मजुरी कामासाठी आंतरराज्यात गेले असून तो त्याच्या आजी-आजोबांसोबत कन्हाळगाव येथे राहतो. अभ्यासाची आवड असलेला प्रतीक नियमित शाळेत हजेरी लावत असतो. दरम्यान, ६ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास जेवणाच्या सुट्टीमध्ये प्रतीक लघुशंकेसाठी स्वच्छतागृहात गेला होता. स्वच्छतागृहात आठव्या वर्गातील काही विद्यार्थी सिगारेट पीत होते. त्यातीलच काही विद्यार्थ्यांनी प्रतिकला पकडून ठेवत सिगारेटचा धूर आपल्या तोंडातून प्रतीकच्या तोंडात टाकला. प्रतीक ने या घटनेची माहिती शालेय शिक्षकांना दिली. शिक्षकांनी त्यावेळी प्रतिकला रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्याऐवजी तोंडात धूर टाकणाऱ्या विद्यार्थ्यांचा शोध घेत त्यांना बेदम मारहाण केल्याचे प्रतिकनेच सांगितले आहे.
तथापि, सायंकाळच्या सुमारास सुट्टी झाल्यावर प्रतीक घरी गेल्यावर त्याने आजीला संपूर्ण प्रकार सांगितला. रात्रीच्या सुमारास त्याच्या पोटात दुखणे व मळमळ सुरु झाले. यामुळेच त्याने रात्री जेवणही केले नसल्याचे त्याच्या आजीने सांगितले आहे.cigarette at school
एकीकडे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची हमी शिक्षण विभाग घेत असाल तरी अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या तोंडात सिगारेटचा धूर टाकल्याने विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याची घटना घडताच सर्व स्तरातून शाळा प्रशासना विरोधात तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी शासन प्रशासनाने तात्काळ दाखल घेऊन शाळेत सिगारेटला परवानगी देणाऱ्या मुख्याध्यापका विरोधात कारवाई करावी अशी मागणी पालकांनी केली आहे.
जेवणाच्या सुट्टीत मी टॉयलेट ला गेलो होते. तिथे शाळेतीलच मोठी मुलं सिगारेट पित होते. त्यांनी मला पकडून माझ्या तोंडात धुवा टाकला. मग मी ही गोष्ट शिक्षकांना सांगीतली. त्यांनी त्या मुलांना खुप मारले.
प्रतिक तांदुळकर, विद्यार्थी