विजय-संगीता यांच्या नात्यात नवा वळण!

    दिनांक :07-Aug-2026
Total Views |
चेन्नई,
Vijay and Sangeeta's relationship तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि टीव्हीकेचे प्रमुख सी. जोसेफ विजय आणि त्यांच्या पत्नी संगीता यांच्या वैवाहिक नात्याबाबत गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चेला आता वेगळे वळण मिळाले आहे. संगीताने चेंगलपट्टू कुटुंब न्यायालयात दाखल केलेली घटस्फोटाची याचिका मागे घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे दोघांमध्ये पुन्हा सलोखा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.संगीताने फेब्रुवारीमध्ये दाखल केलेल्या याचिकेत विजय यांच्या वैवाहिक नात्याबाहेरील संबंधांबाबत आरोप केले होते. हे संबंध २०२१ मध्ये आपल्या निदर्शनास आल्याचा दावा तिने केला होता. विजय यांनी हे संबंध संपवण्याचे आश्वासन दिले होते, मात्र ते कायम राहिल्याचा आरोपही याचिकेत करण्यात आला होता. याशिवाय सामाजिक आणि व्यावसायिक जीवनापासून आपल्याला दूर ठेवले जात असल्याचेही संगीताने नमूद केले होते.
 

d3456 
 
 
याचिकेत सोशल मीडियावरील काही छायाचित्रे आणि विजय यांच्या कथित सार्वजनिक व परदेशातील कार्यक्रमांमुळे आपल्यासह मुलांना सामाजिक दबावाला सामोरे जावे लागल्याचा दावा करण्यात आला होता. आर्थिक निर्बंध आणि मानसिक त्रासाचे आरोपही संगीताने केले होते. मात्र, आता तिनेच घटस्फोटाची याचिका मागे घेतल्याने या प्रकरणाला अनपेक्षित कलाटणी मिळाली आहे.विजय आणि संगीता यांचा विवाह २५ ऑगस्ट १९९९ रोजी झाला होता. त्यांना जेसन संजय आणि दिव्या साशा अशी दोन मुले आहेत. संगीता मूळच्या श्रीलंकन तमिळ पार्श्वभूमीच्या असून त्यांचे बालपण आणि संगोपन यूकेमध्ये झाले. त्या एका प्रतिष्ठित व्यावसायिक कुटुंबातील असल्याचे सांगितले जाते.
 
 
विजय आणि संगीताची भेटही विशेष चर्चेत राहिली आहे. विजय यांच्या अभिनयाची चाहती असलेल्या संगीता त्यांना भेटण्यासाठी लंडनहून चेन्नईला आल्या होत्या. त्यांनी विजयच्या चित्रपटाच्या चित्रीकरणाचे ठिकाण शोधून तेथे त्यांची भेट घेतली. याच भेटीतून दोघांच्या नात्याला सुरुवात झाली आणि पुढे २५ ऑगस्ट १९९९ रोजी ते विवाहबद्ध झाले. आता तब्बल २७ वर्षांच्या वैवाहिक नात्यात घटस्फोटाच्या याचिकेने निर्माण झालेल्या वादानंतर ती मागे घेतल्याने विजय आणि संगीताच्या नात्याबाबत पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.