१ कोटींच्या बक्षिसाचे काय करणार श्रेया कालरा?

    दिनांक :07-Aug-2026
Total Views |
मुंबई,
shreya kalra कंटेंट क्रिएटर आणि पॉडकास्टर श्रेया कालरा हिने ‘लॉक अप: ट्रुथ ऑर डेअर’चा किताब पटकावत ट्रॉफीसह १ कोटी रुपयांचे रोख बक्षीस जिंकले. शोमधून बाहेर आल्यानंतर ‘स्क्रीन’ला दिलेल्या मुलाखतीत तिने या बक्षिसाच्या रकमेचा वापर कसा करणार, याचा खुलासा केला.
 
shreya kalra
 
श्रेया कालराने सांगितले की, १ कोटी रुपयांपैकी काही रक्कम तिची जिवलग मैत्रीण शिल्पा शिंदे यांच्या निराधार महिलांसाठी असलेल्या आश्रमाला मदत करण्यासाठी देणार आहे. याशिवाय, पैसे खर्च करून गाड्या खरेदी करण्यात आपल्याला रस नसल्याचेही तिने स्पष्ट केले. तिच्या वडिलांनी कर्ज घेऊन मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला असून, सध्या तिच्या मनात आश्रमाला मदत करणे आणि मालमत्तेत गुंतवणूक करणे या दोन गोष्टी असल्याचे श्रेयाने सांगितले.
 
‘लॉक अप सीझन २’मधील आपल्या प्रवासाबद्दल बोलताना श्रेयाने सांगितले की, ती अनेकदा एकटीच खेळताना दिसली. शोमध्ये तिच्या शिल्पा शिंदे आणि माधुरी जैन ग्रोव्हर या दोनच मैत्रिणी होत्या. पहिल्या आठवड्यातील भांडणानंतर तिने इतर स्पर्धकांशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला. रामजींना तीन वेळा टास्क पूर्ण करण्यास मदत केल्याचेही तिने सांगितले. मात्र, त्यानंतरही स्पर्धकांचे तिच्याबद्दलचे वागणे बदलले नाही, त्यामुळे काही काळानंतर ती कंटाळली.
 
श्रेया कालरा पहिल्यांदा २०२० मध्ये ‘एमटीव्ही रोडीज रिव्होल्यूशन’मध्ये दिसली होती. वाईल्डकार्ड स्पर्धक म्हणून ती निखिल चिनापाच्या गँगमध्ये सहभागी झाली होती. या कार्यक्रमातील तिचा सहभाग अल्पकाळाचा असला तरी तिच्या स्पष्टवक्तेपणा आणि आत्मविश्वासामुळे तिला सोशल मीडियाच्या पलीकडेही ओळख मिळाली.