डेंग्यूचा सेलिब्रिटींना विळखा; स्वरा भास्करही बाधित

    दिनांक :08-Aug-2026
Total Views |
मुंबई,
celebrities in the grip of dengue पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असताना अभिनेत्री स्वरा भास्कर हिलाही डेंग्यूची लागण झाली आहे. प्रकृती बिघडल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, स्वराने स्वतः इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे याबाबत माहिती दिली आहे.स्वराने रुग्णालयातील बेडवरून एक फोटो शेअर केला. या छायाचित्रात तिच्या हाताला कॅन्युला लावलेला दिसत असून, ती बेडवर विश्रांती घेताना दिसत आहे. डेंग्यू झाल्याने रुग्णालयात दाखल व्हावे लागल्याचे तिने सांगितले. तिच्या प्रकृतीची माहिती समोर आल्यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर तिच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

celebrities in the grip of dengue 
 
दरम्यान, ‘बालिका वधू’ फेम अभिनेत्री अविका गोरलाही डेंग्यूची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिचा पती मिलिंद चंदवाणी यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत तिच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. अविकाला सलग पाच दिवस १०३ ते १०४ अंश ताप होता. एवढा ताप असतानाही तिने एका प्रकल्पाच्या शूटिंगचे उर्वरित दोन दिवसांचे काम पूर्ण केले.मिलिंद यांच्या माहितीनुसार, अविकाने १०४ अंश ताप असतानाही काम पूर्ण केले आणि संपूर्ण प्रकल्पाचे शूटिंग अवघ्या एका दिवसात पूर्ण झाले. त्यानंतर तिला दोन दिवसांची सुट्टी मिळाली. मात्र, या काळातही ती अत्यंत अशक्त होती. तिला व्यवस्थित हालचाल करणे आणि जेवणेही कठीण जात होते. डेंग्यू चाचणी सकारात्मक आल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्वरा भास्कर यापूर्वी तिचा पती फहाद अहमदसोबत ‘पती पत्नी और पंगा’ या टीव्ही कार्यक्रमात दिसली होती. सध्या तिच्या पुढील प्रकल्पाची अधिकृत घोषणा झालेली नाही.