गडचिरोली
prashant-bhruguwar गडचिरोली येथील रहिवासी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्व पुर्णवेळ कार्यकर्ते, विश्वहिंदू परिषदेचे माजी जिल्हा महामंत्री, भारतीय जनता पार्टीचे सक्रिय नेते तसेच दै. तरुण भारतचे वितरण प्रतिनिधी प्रशांत भृगुवार यांचे काल मध्यरात्रीच्या सुमारात आकस्मित निधन झाले.
मृत्यूसमयी ते ५८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई-वडिल, पत्नी आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी १२.३० वाजता येथील कठाणी नदीघाटावर अन्त्यसंस्कार करण्यात आला.