वर्धा नागरी बँकेत कर्मचाऱ्यांसाठी एसएफटी कार्यशाळा

    दिनांक :08-Aug-2026
Total Views |
वर्धा,
wardha nagari bank वर्धा नागरी बँकेच्या मुख्यालयात सहाय्यक आयकर आयुक्त संस्कार गुप्ता, आयकर अधिकारी श्रवण कुमार व सतीश कोल्हे यांनी ग्राहकांचे व्यवहार व त्यांचे अहवाल तपासणी संदर्भात भेट दिली.
 

wardha nagari bank, wardha, sft, income tax, income tax department, tds, bank workshop, financial transactions, e verification, banking news, wardha news, maharashtra news, tax compliance, latest news 
या भेटीदरम्यान बँकेच्या मुख्यालयात बँकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांकरिता एस.एफ.टी. बाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला संस्कार गुप्ता व श्रवण कुमार यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी वर्धा नागरी बँकेचे अध्यक्ष डॉ. विनय देशपांडे, उपाध्यक्ष मंगेश परसोडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विलास दाताळकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी समीर गोविलकर, राजेश कुचेवार, आयटी सेक्शन इन्चार्ज नितीन देशपांडे, रेणू बिंबाळकर, वैशाली पार्डीकर, ऋषिकेश कोटंबकर, विकास झाडे, सुनील दाभाडे तसेच अन्य कर्मचारी उपस्थित होते.
आयकर कार्यशाळेत अधिकाऱ्यांनी ग्राहकांच्या आर्थिक व्यवहारांचे विवरण आयकर विभागाला सादर करताना घ्यावयाची काळजी, टीडीएस कायद्यात झालेल्या सुधारणा आदी विषयी मार्गदर्शन करून बँक अधिकाऱ्यांच्या शंकांचे निरसन केले. या कार्यशाळेत ई व्हेरीफिकेशन २०२१ च्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये आर्थिक व्यवहारांद्वारे प्राप्त माहितीच्या भूमिकेवर प्रकाश टाकण्यात आला.