रिसोडमध्ये तंबाखू विक्रेत्यावर प्रशासनाची दंडात्मक कावाई

रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी

    दिनांक :09-Aug-2026
Total Views |
मालेगाव,
tobacco seller in risod शहर परिसरात गेल्या काही दिवसापासून घरफोडी आणि चोरीच्या घटनामध्ये मोठी वाढ झाली आहे. या वाढत्या गुन्हेगारीमुळे शहरातील नागरिक आणि व्यापार्‍यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी आणि शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने रात्रीची पोलीस गस्त तत्काळ वाढवावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
 
 

tobacco seller in risod 
 
 
काही दिवसांपूर्वी संतोषी माता मंदिर परिसरातील मिश्रा यांच्या घरी चोरीची घटना घडली होती. या घटनेचा तपास सुरू असतानाच मुख्य बाजारपेठेतील रोकडे यांचे दुकान फोडल्याचा प्रकार समोर आला. तसेच, अकोला फाटा परिसरात चोरट्यांनी एकाच रात्री दोन घरे फोडून पोलिसांच्या गस्तीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या एकापाठोपाठ घडलेल्या घटनांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. त्यामुळेचोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे पोलिसांसमोर आव्हान उभे ठाकले आहे.
मालेगाव परिसरातील रहिवाशी वस्ती वेगवेगळ्या भागात पसरलेली आहे. या भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेत चोरटे वेगवेगळ्या भागात चोर्‍या करत आहेत. त्यामुळे अशा चोरट्यांचा तातडीने सुगावा लावून त्यांना जेरबंद करण्याचे मोठे आव्हान पोलिस प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.tobacco seller in risodमालेगाव शहरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ची गरज असून, शहराचा विस्तार पाहता रात्रीची गस्त अधिक प्रभावी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मालेगाव शहरासाठी अतिरिक्त पोलिस बळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे. गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार करून या चोर्‍यांचा लवकरात लवकर पर्दाफाश करावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. सुरक्षिततेचा उपाय म्हणून नागरिकांनी कामानिमित्त बाहेरगावी जाताना आपल्या घराच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घ्यावी आणि याबाबतची पूर्वकल्पना स्थानिक पोलिस ठाण्याला देऊन सहकार्य करावे.