आंध्र प्रदेश
andhra pradesh bus accident आंध्र प्रदेशातील अनंतपुर जिल्ह्यात भीषण रस्ते अपघात झाला. एका खासगी व्होल्वो बसची आयशर ट्रकला जोरदार धडक बसल्यानंतर बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि दोन्ही वाहने पोगुरु पुलावरून खाली कोसळली. या दुर्घटनेत सुमारे 40 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी 10 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची तीव्रता इतकी होती की, बस आणि ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
अपघातानंतर घटनास्थळी एकच आक्रोश आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिक तसेच पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू करून बसमध्ये अडकलेल्या आणि जखमी झालेल्या प्रवाशांना बाहेर काढले. त्यानंतर सर्व जखमींना उपचारासाठी पमिडी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमी प्रवाशांना पुढील उपचारांसाठी अनंतपुर सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
या दुर्घटनेत बसचा चालकही वाहनात गंभीररीत्या अडकला होता. त्याला बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी जेसीबीची मदत घेतली. बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर चालकाला बाहेर काढण्यात यश आले. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, पोलिसांनी या अपघाताची andhra pradesh bus accident नोंद करून तपास सुरू केला आहे. नेमका अपघात कशामुळे झाला, याचा शोध घेतला जात आहे. अपघातानंतर घटनास्थळी मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी झाली होती. प्रत्यक्षदर्शींनी हा अपघात अत्यंत भीषण असल्याचे सांगितले. बस आणि ट्रकची धडक झाल्यानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात आरडाओरड सुरू झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह स्थानिक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांच्या मदतीने प्रवाशांना वेळीच वाहनांमधून बाहेर काढून रुग्णालयात पाठविण्यात आले.दरम्यान, गेल्या महिन्यात आंध्र प्रदेशातील विजयनगरम जिल्ह्यातही भीषण रस्ते अपघात झाला होता. चेल्लुरु येथे झालेल्या या दुर्घटनेत आठ वर्षांच्या मुलासह तीन जणांचा मृत्यू झाला होता, तर अन्य 13 जण जखमी झाले होते. पोलिसांच्या माहितीनुसार, हे सर्वजण तीर्थयात्रेसाठी रायगडाकडे जाणाऱ्या एका व्हॅनमधून प्रवास करत होते.चेल्लुरुजवळ व्हॅन थांबलेली असताना विशाखापट्टणमकडून येणाऱ्या भरधाव ट्रकने व्हॅनला पाठीमागून जोरदार धडक दिली होती. या अपघातातील जखमींना विजयनगरम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.