अस्थिका समाजाचा १९ वा दीपोत्सव

    दिनांक :09-Aug-2026
Total Views |
नागपूर,
Asthika Samaj अस्थिका समाजाच्या वतीने १९ वा दीपोत्सव सोहळा १२ ते १४ ऑगस्टदरम्यान त्रिमूर्तीनगर येथील श्री भगवती सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. १२ ऑगस्ट रोजी गणपती पूजन व घटस्थापनेने सोहळ्याला प्रारंभ होईल. यानंतर कु. आध्या वेंकटेश यांचे प्रवचन होणार आहे.
 
 
asthika
 
 
१४ ऑगस्ट रोजी आदिपुरम दिनानिमित्त गणपती, कन्या व कुमारी पूजन, वेदपारायण, सुहासिनींची दीपपूजा तसेच ‘महिषासुर मर्दिनी’ नृत्य सादरीकरण होईल. मंगळआरतीनंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सचिव के. व्ही. नागराजन यांनी केले आहे.
सौजन्य:देवराव प्रधान ,संपर्क मित्र