ऐतिहासिक कामगिरी... भारताच्या पदकांची ‘हॅट्ट्रिक

    दिनांक :09-Aug-2026
Total Views |
युजेन
basant meghwal जागतिक अॅथलेटिक्स अंडर-20 चॅम्पियनशिपमध्ये भारताने संस्मरणीय कामगिरी करताना पदकांची संख्या तीनवर नेली आहे. राजस्थानच्या श्री गंगानगर जिल्ह्यातील अनुपगढ या सीमावर्ती शहराचा रहिवासी असलेल्या 19 वर्षीय बसंत कुमार मेघवालने पुरुषांच्या उंच उडीत रौप्यपदक पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली. जागतिक अंडर-20 चॅम्पियनशिपच्या उंच उडी प्रकारात पदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. त्याच दिवशी शहनवाझ खानने पुरुषांच्या लांब उडीत कांस्यपदक जिंकत भारताच्या यशात आणखी भर घातली.
 

basant meghwal creates history, shahnawaz khan wins bronze as india reaches three medals at u20 worlds 
चॅम्पियनशिपच्या चौथ्या दिवशी मेघवालने आपल्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद करत 2.21 मीटरची उडी मारली आणि रौप्यपदकावर नाव कोरले. अल्जेरियाच्या युनेस अयाचीनं सुवर्णपदक, तर ब्रिटनच्या ओटिस पूलनं कांस्यपदक मिळवलं. विशेष म्हणजे तिन्ही पदकविजेत्यांना 2.21 मीटरपर्यंतच मजल मारता आली आणि त्यानंतरची 2.24 मीटरची उंची कोणालाही पार करता आली नाही. त्यामुळे त्याआधीची उंची पार करण्यासाठी प्रत्येकाने घेतलेल्या प्रयत्नांच्या संख्येच्या आधारे अंतिम क्रमवारी निश्चित करण्यात आली. अयाचीनं 2.21 मीटरची उंची पहिल्याच प्रयत्नात पार केली, तर मेघवाल आणि पूल यांनी अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रयत्नात ही उंची गाठली.भारतीय नौदलात कार्यरत असलेल्या मेघवालच्या या कामगिरीमुळे भारतीय अॅथलेटिक्सच्या इतिहासात आणखी एक महत्त्वाची नोंद झाली आहे. जागतिक अंडर-20 चॅम्पियनशिपमध्ये उंच उडीत पदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.यानंतर पुरुषांच्या लांब उडीच्या अंतिम फेरीत 18 वर्षीय शहनवाझ खानने 7.84 मीटरची सर्वोत्तम उडी नोंदवत कांस्यपदक पटकावले. त्याने तिसऱ्या प्रयत्नात ही सर्वोत्तम कामगिरी केली. त्याच्या सहा प्रयत्नांमध्ये अनुक्रमे 7.67 मीटर, 7.72 मीटर, 7.84 मीटर, 7.52 मीटर, 7.83 मीटर आणि 5.37 मीटर अशा उड्या नोंदल्या गेल्या.
या अंतिम फेरीत पोहोचलेला दुसरा भारतीय खेळाडू आरसी जिथिन अर्जुनन 7.59 मीटरच्या सर्वोत्तम उडीसह आठव्या स्थानावर राहिला. त्याने पहिल्या आणि चौथ्या प्रयत्नात 7.59 मीटरची उडी नोंदवली.
इटलीच्या डॅनिएल इन्झोलीनं 7.97 मीटरची सर्वोत्तम उडी मारत लांब उडीतील सुवर्णपदक पटकावले, तर ऑस्ट्रेलियाच्या मेसन मॅकग्रोडरनं 7.96 मीटरसह रौप्यपदक जिंकले. शहनवाझच्या कांस्यपदकामुळे या स्पर्धेतील भारताच्या पदकांची एकूण संख्या तीन झाली.
यापूर्वी स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी basant meghwal पुरुषांच्या भालाफेकीत आशिष यादवने रौप्यपदक जिंकून भारताचे पदक खाते उघडले होते. जागतिक अंडर-20 चॅम्पियनशिपमध्ये भालाफेकीत रौप्यपदक जिंकणारा यादव हा दुसरा भारतीय ठरला आहे. त्याच्याआधी नीरज चोप्राने या स्पर्धेत भालाफेकीत रौप्यपदक जिंकले होते.