‘हर घर तिरंगा’ अभियानाचा दिमाखदार शुभारंभ

७० मीटर लांब तिरंग्यासोबत हजारो नागपूरकर रस्त्यावर

    दिनांक :09-Aug-2026
Total Views |

 

नागपूर
har-ghar-tiranga स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार ‘हर घर तिरंगा’ अभियानाला आज नागपुरातून दिमाखदार सुरुवात झाली. नागपूर महानगर पालिकेच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य तिरंगा रॅलीत हजारो नागरिक, विद्यार्थी, माजी सैनिक आणि सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या. महापौर नीता ठाकरे यांच्या हस्ते बाजी प्रभू देशपांडे चौक, रामनगर येथून सायंकाळी ५ वाजता रॅलीला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. लक्ष्मीभुवन चौक मार्गे निघून शंकरनगर चौकात रॅलीचा समारोप झाला.

tiranga 
 

देशभक्तीचा जनसागर रस्त्यावर

रॅलीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे ७०० मीटर लांबीचा तिरंगा ध्वज होता. हा तिरंगा हातात घेऊन शेकडो युवक आणि नागरिक चालत होते. रॅलीमध्ये मनपा शाळेतील विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक पथक, पारंपरिक वेषभूषेतील शीख बांधव आणि मोठ्या संख्येने माजी सैनिक सहभागी झाले होते. ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. ढोल-ताशांच्या गजरात नागरिकांनी देशभक्तीपर गीतांवर ठेका धरला. रॅलीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. कृष्णा खोपडे, आ. संजय भेंडे, सत्ता पक्ष नेते नरेंद्र ‘बाल्या’ बोरकर, माजी महापौर दयाशंकर तिवारी, उपमहापौर लीला हाथीबेड, अर्चना डेहनकर, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी, आयुक्त डॉ. विपीन यांच्यासह अतिरिक्त आयुक्त मुरुगनाथम एम. उपस्थित होते.
 

१ लाख ७५ हजार तिरंगा वाटप

महापौर नीता ठाकरे म्हणाल्या, हर घर तिरंगा ही केवळ मोहीम नाही, तर प्रत्येक भारतीयाच्या मनातील देशभक्ती जागवण्याचा संकल्प आहे. मनपातर्फे शहरातील १ लाख ७५ हजार नागरिकांपर्यंत तिरंगा झेंडा पोहोचवला जाणार आहे. प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा लावून १५ ऑगस्ट साजरा करावा. मनपा शाळेतील विद्यार्थी आणि आर्थिक दुर्बल भागात विशेषतः झेंड्यांचे वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
 
 

पुढील ७ दिवस काय?

अभियानांतर्गत पुढील कार्यक्रम:

- १० ऑगस्ट : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कविवर्य सुरेश भट सभागृह येथे तिरंगा वंदे मातरम प्रदर्शनी आणि मोठी तिरंगा रांगोळी.

- १३ ऑगस्ट : चिटणीस पार्क येथे वंदे मातरम सांस्कृतिक कार्यक्रम.

- १४ ऑगस्ट : दयानंद पार्क, जरीपटका येथे फाळणी स्मृती दिन कार्यक्रम.

- १५ ऑगस्ट : कविवर्य सुरेश भट सभागृह येथे तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम.