रिओच्या जंगलात हेलिकॉप्टर दुर्घटना; पायलटसह तीन पर्यटकांचा मृत्यू

    दिनांक :09-Aug-2026
Total Views |
ब्राझिल,
helicopter crash रिओ डी जेनेरियो येथील डोंगराळ आणि जंगल परिसरात हेलिकॉप्टर अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह तीन पर्यटक प्रवास करत होते. अपघातानंतर चौघांचाही मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिली आहे.
 
 

helicopter crash  
दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र, अपघाताचे ठिकाण अत्यंत दुर्गम आणि घनदाट जंगलात असल्याने बचावकार्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. डोंगराळ भूभागामुळे घटनास्थळी पोहोचणेही पथकांसाठी आव्हानात्मक ठरले.
अपघातात मृत्यू झालेल्या चौघांपैकी दोन जणांचे मृतदेह गंभीररीत्या भाजले आहेत. त्यामुळे त्यांची ओळख निश्चित करण्यासाठी न्यायवैद्यक तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे.helicopter crash मृतदेहांची ओळख पटवण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही.
दुर्गम भौगोलिक परिस्थिती आणि मृतदेहांची झालेली अवस्था यामुळे बचाव तसेच ओळख पटवण्याच्या प्रक्रियेला विलंब होत आहे. दुर्घटनेमागील नेमके कारण काय होते, याचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू करण्यात आला आहे.