नागपूर,
Maharashtra Electricity महाराष्ट्र वीज निवृत्त ज्येष्ठ नागरिक संघ, नागपूर जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक घाट रोड येथील महाराष्ट्र वीज कामगार महासंघ कार्यालयात नुकतीच पार पडली. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष त्रिलोचन खरबडे होते. यावेळी महामंत्री शंकर पहाडे, सचिव मधुकर वनकर व प्रसिद्धी प्रमुख मधुकर महल्ले उपस्थित होते.
मधुकर वनकर यांनी प्रास्ताविक केले. महामंत्री शंकर पहाडे यांनी उपस्थितांच्या विविध प्रश्नांवर मार्गदर्शन केले. तसेच पेन्शनसारखा जटिल विषय सोप्या भाषेत समजावून सांगत उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले.अध्यक्षीय भाषणात त्रिलोचन खरबडे यांनी संघटनेच्या कार्याबाबत मार्गदर्शन केले. रमेश सोळंकी यांनी आभार मानले. यावेळी दिवंगत निवृत्त सभासद सूर्यभान वनकर यांना श्रद्धांजली अर्पण करून बैठक समाप्त करण्यात आली.
सौजन्य:शंकर पहाडे,संपर्क मित्र