भरोसा सेलमध्ये ज्येष्ठ नागरिकांची सभा

ऑक्टोबरमध्ये भव्य मेळावा

    दिनांक :09-Aug-2026
Total Views |
नागपूर,
Nagpur Police Bharosa Cell पोलीस लाईन टाकळी येथील नागपूर पोलीस भरोसा सेल कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांची विशेष सभा नुकतीच घेण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या, हक्क तसेच सुरक्षेच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.सभेनंतर भरोसा सेलच्या पोलीस निरीक्षक वर्षा मते यांच्याशी ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली. कौटुंबिक व सामाजिक अडचणींमध्ये पोलीस प्रशासनाकडून उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या मदतीबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
 
 
polic
 
 
येत्या ऑक्टोबरमध्ये जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त भव्य मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.बैठकीस डॉ. दीपक शेंडेकर, डॉ. मिलिंद वाचनेकर, मधुकर दहिकर, सुनील अडवे, ॲड. किरण मोहिते, श्रीधर नहाते, विजय बावनकर, प्रमोद ठोंबरे, महेंद्र नवलाखे आदी उपस्थित होते. डॉ. दीपक शेंडेकर यांनी पोलीस निरीक्षक वर्षा मते, सागर मॅडम व रोशनी बोरकर यांचे आभार मानले.
सौजन्य:डॉ. दीपक शेंडेकर,संपर्क मित्र