मोदी भेटीआधीच पाटील-फडणवीस एकत्र?

महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा

    दिनांक :09-Aug-2026
Total Views |
मुंबई,
Patil and Fadnavis come together महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाभोवती पुन्हा एकदा चर्चांना वेग आला आहे. पवार गटाचे खासदार १० ऑगस्ट रोजी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे. या भेटीच्या पार्श्वभूमीवर आज ९ ऑगस्ट रोजी पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईहून कोल्हापूरपर्यंत एकत्र प्रवास केला. त्यांच्यासोबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरही होते.पवार गटाचे खासदार मोदींची भेट घेणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची भूमिका आणि आगामी राजकीय दिशा याबाबत चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः मतदारसंघ पुनर्रचनेशी संबंधित विधेयकाच्या पार्श्वभूमीवर ही भेट होत असल्याने त्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढणे घाईचे ठरेल, असे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
 
Patil and Fadnavis come together
 
दरम्यान, जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांचा एकत्रित प्रवास हा देखील राजकीय चर्चेचा विषय ठरला आहे. दोन्ही नेत्यांनी मुंबई ते कोल्हापूर असा प्रवास एकत्र केल्याने हा केवळ योगायोग आहे की त्यामागे काही राजकीय संदेश आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाच्या चर्चांना उधाण आले आहे. त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यताही चर्चेत आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने या चर्चांना यापूर्वीच नकार दिला आहे.यापूर्वी जंतरमंतरवरील आंदोलनादरम्यान शरद पवार यांनी अभिजीत दीपके यांची भेट घेतली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही त्यांनी भेट घेतल्याने या भेटीची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा झाली होती. महाराष्ट्रातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी ही भेट झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, दोन्ही नेत्यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणांबाबत तर्कवितर्क सुरू झाले होते.
 
आता पवार गटाचे खासदार पुन्हा पंतप्रधान मोदींची भेट घेणार असल्याने या घडामोडीकडे राजकीय संकेत म्हणून पाहिले जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून जयंत पाटील यांच्या संभाव्य मंत्रिपदाबाबतही चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आल्यास जयंत पाटील यांच्याकडे अर्थमंत्रिपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते, अशीही राजकीय चर्चा आहे.दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीमागील कारण स्पष्ट करताना खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे. महाराष्ट्रातील पाणीप्रश्न, शेतकरी आत्महत्या, वाढते शहरीकरण आणि खासदारांना मिळणाऱ्या पाच कोटी रुपयांच्या विकास निधीच्या अंमलबजावणीतील अडचणी हे मुद्दे पंतप्रधानांसमोर मांडले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
संसदेचे कामकाज सुरळीतपणे सुरू नसल्याने महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाचे प्रश्न मांडण्यास अडचणी येत असल्याचेही सुळे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र सरकारकडून खासदारांना अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचा मुद्दाही बैठकीत मांडला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान कार्यालयाकडून १० ऑगस्ट रोजी भेटीची वेळ देण्यात आली आहे.सुप्रिया सुळे यांनी एफसीआरए विधेयकाला विरोध करण्याची पक्षाची भूमिका कायम असल्याचेही स्पष्ट केले आहे. तसेच मतदारसंघ फेररचनेचे विधेयक अद्याप आलेले नसल्याचे सांगत त्यांनी या मुद्द्यावर सूचक वक्तव्य केले आहे. त्यामुळे पवार गटाच्या खासदारांची मोदींसोबतची बैठक आणि त्याचवेळी जयंत पाटील-फडणवीस यांचा एकत्रित प्रवास यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील काही दिवसांत कोणती नवी राजकीय समीकरणे आकाराला येतात, याकडे लक्ष लागले आहे.
 
महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाभोवती पुन्हा एकदा चर्चांना वेग आला आहे. पवार गटाचे खासदार १० ऑगस्ट रोजी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे. या भेटीच्या पार्श्वभूमीवर आज ९ ऑगस्ट रोजी पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईहून कोल्हापूरपर्यंत एकत्र प्रवास केला. त्यांच्यासोबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरही होते.पवार गटाचे खासदार मोदींची भेट घेणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची भूमिका आणि आगामी राजकीय दिशा याबाबत चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः मतदारसंघ पुनर्रचनेशी संबंधित विधेयकाच्या पार्श्वभूमीवर ही भेट होत असल्याने त्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढणे घाईचे ठरेल, असे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.