प्रहारच्या जय बेलखडेंचा राजीनामा

पक्षाकडून निष्कासनाची कारवाई

    दिनांक :09-Aug-2026
Total Views |
वर्धा,
jay belkhade आर्वी विधानसभा मतदारसंघातील प्रहार संघटनेचे प्रमुख नेते जय बेलखडे यांनी संघटनेपासून फारकत घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. बेलखडे यांनी ८ ऑगस्टच्या रात्री संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांची भेट घेतल्यानंतर आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिल्याची माहिती दिली. तर दुसर्याच दिवशी ९ ऑगस्ट रोजी वर्धा जिल्हा प्रहार संघटनेच्या वतीने पत्र जारी करून बेलखडे यांना संघटनेतून निष्कासीत करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
 
 
jay belkhade
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, ८ ऑगस्ट रोजी कारंजा येथे शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीने नगरपंचायतीच्या माध्यमातून आयोजित एका कार्यक्रमाला बच्चू कडू प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. याचदरम्यान एका रेस्टॉरंटमध्ये जय बेलखडे यांनी बच्चू कडू यांची भेट घेतली. यावेळी बेलखडे यांनी संघटनेतील सर्व पदांचा राजीनामा दिल्याचे सांगण्यात येते. जय बेलखडे हे आर्वी विधानसभा मतदारसंघात प्रहार संघटनेच्या विस्तारासाठी सक्रियपणे कार्यरत होते. त्यांनी विधानसभा निवडणुकही लढवली होती. या निवडणुकीत त्यांना १४ हजारांहून अधिक मते मिळाली होती.jay belkhade दरम्यान, कारंजा नगरपंचायतीमध्ये शिंदे गटाच्या पदाधिकार्यांसोबत असलेल्या राजकीय मतभेदांमुळे कार्यक्रमाच्या निमंत्रणावरूनही बेलखडे नाराज असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याबाबत संघटनेकडून कोणतेही अधिकृत कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही. ९ ऑगस्ट रोजी वर्धा जिल्हा प्रहार संघटनेच्या वतीने जारी करण्यात आलेल्या पत्रात जय बेलखडे यांना संघटनेतून निष्कासित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. तसेच, यापुढे त्यांचा प्रहार संघटनेशी कोणताही संबंध नसल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.