किरण राजदेरकर
ravikiran mahajan जीवनाच्या ऐन उमेदीत वयाच्या २२ व्या वर्षी नियतीने डाव साधला. स्वेच्छानिवृत्ती लादली. सांधे आखडून शारीरिक हालचालीवर बंधने आली. पण तरीही मनाची संवेदना या सेवानिवृत्ताने हळू दिली नाही. अंथरुणावर खिळून रहाण्याची परिस्थिती असूनही फिनिक्स पक्षाप्रमाणे कार्यरत रहात, आपल्यावर आलेले संकट जीवनात काहीतरी शिकवणारे असल्याची जाणीव ठेवत आणि अभियांत्रिकी शिक्षित असल्याचे भान ठेवत वा शिल्पकाराने अनेकांच्या मने व आरोग्य निर्मितीचा वसा घेतला, रविकिरण महाजन हे त्यांचे नाव. भविष्यात पर्यावरण व ऊर्जा संवर्धन यांची नितांत गरज ते पटवून देत आहेत. ते म्हणाले, यवतमाळ जिल्ह्यात बालपण गेले. वडील प्राथमिक शिक्षक, कौटुंबिक परिस्थिती बेताचीच, वालपण निसर्गाच्या सान्निध्यात गेले. निसर्गाच्या एकरूप झाल्याची, निसर्ग एकदम जवळून अनुभवला. सातवीत नागपुरात नूतन भारत विद्यालयात प्रवेश घेतला. शहरी जीवन एकदमच नवीन होते. गणवेश कसा असतो, हेदेखील माहिती नव्हते. अभियांत्रिकी शिक्षणानंतर मुंबईत उत्तम नोकरी लागली. श्रीमंती महणजे काय, याचाही अनुभव मैतला. सगळे उत्तम सुरू असताना १९९०मध्ये संधीवात झाला. आजार बळावला. रक्त तपासणीत काही महिन्यांचेच आयुष्य असल्याचा अहवाल आला. १९९५ मध्ये लग्न झाले.

१ मे २००१ मध्ये नोकरी सोडून नागपुरात परत यावे लागले. एका पायाने चालता येत होते. नंतर शरीराच्या एकूणच सांध्यांनी साथ सोडली. सुमारे तीन वर्षे अंथरुणावर खिळून रहावे लागले. हा काळ आतंरिक परिवर्तनाचा काळ होता. जीवनात प्रचंड ऊर्जा निर्माण झाली. १५ वर्षाच्या नोकरीनंतर जीवनाचा रंगच बदलला. तसाही आधी नास्तिक होतो. पण, बदल स्वीकारला. वाचन सुरू केले. विविध विषयांवरील पुस्तके वाचत होतो, आजही वाचतो. वाचनानंतर जीवनाकडे पाहण्याची दृष्टीच बदलली. आस्तिक झालो. भविष्याचा विचार करता पर्यावरण व ऊर्जा संवर्धन गरजेचे असल्याचे उमगले, या दिशेने अभ्यास सुरू केला. यादरम्यान, हेमंत मोहरीर, अरुण डोळके व काही मित्रांसह निसर्गायन मंडळ सुरू केले. बालपण निसर्गाच्या सान्निध्यात गेले. निसर्गाच्या एकरूप झालो होतो. निसर्ग एकदम जवळून अनुभवला. शहरात आल्यानंतर निसर्ग दूर केल्याचे जाणवले. मानवी जीवनात निसर्गाचे स्थान किती महत्त्वाचे आहे, हे जाणवले. एकंदरितच मानव निसर्गाच्या दूर गेल्याने मानवाच्या जीवन व शरीरावर दुष्परिणाम झाला आहे. चालणे कमी झाले, विलासामुळे झोप कमी झाली. आहारही बदलला. त्यामुळे आजारपण वाढले. उठसुठ औषधे घेतल्याने रोगप्रतिकारशक्ती हरवली. आनंद संपला. यावर उपाय म्हणून निसर्गोपचाराचा अवलंब सुरू केला. माझ्या घरी एसी नाही. केवळ पंखा, खुपच गरज भासते तेव्हाच कूलर लावतो, पत्नी व मुलगाही खुपच गरज असेल तेव्हाच कार वापरतात. आहार, निसर्गोपचार याबाबत मार्गदर्शन सुरू केले. आजही अनेक तरुणसुद्धा (आजच्या भाषेत सांगायचे तर जेन झी) घरी येत असतात. अनेकांच्या घरी जाऊनही निसर्गोपचार करतो. पंचकर्म, बायोकेमिक, होमिओपॅथी, आयुर्वेद, आहार शास्त्र वाबाबत मार्गदर्शन करतो. हे आनंदी जीवन जगतो ते पत्नी, कुटुंबीय व आप्तेष्ट मित्रांमुळे. योगाभ्यासी मंडळाचे रामभाऊ खांडवे हे जीवनाचे मार्गदर्शक, प्रामाणिक जीवन जगा, भारतीय आहार घ्या, विलासी जीवन नको, समाधानी रहा, निसर्गाच्या जवळ रहा व तसे जीवन जगा, असा जगण्याचा मंत्र रविकिरण महाजन यांनी सांगितला.