नागपूर,
Saraswati Vidyalaya शंकरनगर येथील सरस्वती विद्यालय हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये शनिवार, ८ ऑगस्ट रोजी एसएससी व एचएसएससी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ झाला .कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे जी, सीएसआयआर-नीरी, वैज्ञानिकचे डॉ. कृष्णमूर्ती कन्नन होते . यांचे स्वागत दक्षिण भारतीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष टी. के. व्यंकटेश यांनी केले. मुख्याध्यापिका डॉ. रेशमी उमेश यांनी एसएससी व एचएसएससी निकालाचा अहवाल सादर केला. गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
डॉ. कन्नन यांनी विद्यार्थ्यांनी स्व-विकासावर भर देत विज्ञान क्षेत्रातील विविध शैक्षणिक संधींचा शोध घ्यावा, असे आवाहन केले. अध्यक्ष टी. के. व्यंकटेश यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक आणि शुभेच्छा दिल्या.यावेळी संस्थेचे पदाधिकारी, व्यवस्थापन सदस्य, शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन अनुजा कोलते व भवानी यांनी केले. रश्मी निंकाजे यांनी आभार मानले.
सौजन्य:अनघा पेंडके,संपर्क मित्र