मेघगर्जना, मुसळधार पाऊस अन् वादळी वारे!

देशातील अनेक राज्यांना अलर्ट

    दिनांक :01-Sep-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Alert to many states in the country देशातील अनेक भागांमध्ये मान्सूनचा जोर कायम असून, १ सप्टेंबर रोजी दिल्लीसह १५ हून अधिक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडसह विविध राज्यांमध्ये खराब हवामानाची शक्यता व्यक्त केली आहे. डोंगराळ भागांमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलनाचा धोका निर्माण होऊ शकतो. काही भागांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि गारपिटीची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. हवामानातील या बदलामुळे अनेक नद्यांच्या पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. पूर्व भारतातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपीट होऊ शकते.
 
 
 
354455654
जोरदार वारे आणि पावसाचा परिणाम शेतीवर होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, आसाम, सिक्कीम आणि केरळमध्ये मुसळधार पाऊस व जोरदार वाऱ्याची शक्यता आहे.राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आज संध्याकाळच्या सुमारास अनेक भागांत पाऊस आणि मेघगर्जना होण्याचा अंदाज आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी सुमारे २० ते ३० किलोमीटर राहू शकतो. दिल्लीत कमाल तापमान सुमारे ३४ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान सुमारे २७ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
 
 
 
उत्तर प्रदेशातील मेरठ, मुझफ्फरनगर, गाझियाबाद, मोरादाबाद, गौतम बुद्ध नगर, आग्रा, मथुरा, चित्रकूट, बांदा, सोनभद्र, मिर्झापूर, कानपूर, बदाऊन, सीतापूर, बाराबंकी, जालौन, हमीरपूर, महोबा, झाशी, ललितपूर, प्रयागराज आणि गोरखपूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये पाटणा, सिवान, सारण, भोजपूर, मुझफ्फरपूर, समस्तीपूर, दरभंगा, मधुबनी, पूर्णिया, कटिहार, मधेपुरा, किशनगंज, बेगुसराय, खगरिया, भागलपूर, मुंगेर, सहरसा आणि सुपौल येथेही खराब हवामानाचा अंदाज आहे. झारखंडमध्ये रांची, जमशेदपूर, बोकारो, दुमका, पश्चिम सिंगभूम, पूर्व सिंगभूम, सरायकेला, पलामू, धनबाद, साहेबगंज, गिरिडीह आणि हजारीबाग येथे मुसळधार पाऊस आणि मेघगर्जना होण्याची शक्यता आहे. उत्तराखंडमध्ये ऋषिकेश, डेहरादून, नैनिताल, बागेश्वर, अल्मोरा, पिथोरगड, चंपावत, चमोली, हरिद्वार आणि रुद्रप्रयागमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असून, डोंगराळ भागात भूस्खलनाचा धोका कायम आहे. त्यामुळे असुरक्षित ठिकाणी जाणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
 
 
हिमाचल प्रदेशातील शिमला, मंडी, कुल्लू, कांग्रा, बिलासपूर, सोलन आणि लाहौल-स्पिती येथेही मुसळधार पावसाची शक्यता आहे. जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग, कठुआ, पूंछ, जम्मू, बारामुल्ला, उधमपूर, किश्तवार, गांदरबल, शोपियान आणि रियासी येथे पाऊस व मेघगर्जना होण्याचा अंदाज असून, असुरक्षित भागांतील नागरिकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.पश्चिम बंगालमध्ये जलपाईगुडी, अलीपुरद्वार, कूचबिहार, बीरभूम, मुर्शिदाबाद, कोलकाता, हावडा आणि कलिमपोंग येथे मुसळधार पाऊस व जोरदार वारे वाहू शकतात. पंजाबमधील पठाणकोट, अमृतसर, जालंधर, पटियाला, संगरूर, भटिंडा, गुरुदासपूर, कपूरथला आणि लुधियाना येथेही पाऊस व वादळी हवामानाचा इशारा आहे. राजस्थानमधील जोधपूर, उदयपूर, कोटा, बारन, अजमेर, करौली, दौसा, नागौर, पाली, भरतपूर आणि बांसवाडा येथे पाऊस व जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशातही हवामान बदलण्याचा अंदाज असून, भोपाळ, ग्वाल्हेर, शिवपुरी, गुना, विदिशा, सागर, दमोह, रायसेन, मंदसौर, नीमच आणि आगर-मालवा येथे मुसळधार पाऊस आणि वादळी हवामानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित भागांतील नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष देत आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.