कोंढाळा ग्रामपंचायत कार्यालयावर धडकला नागरिकांचा मोर्चा

जनतेशी भेदभाव योग्य नाही : सुनिल पारधी

    दिनांक :01-Sep-2026
Total Views |
देसाईगंज
citizens-march  तालुक्यातिल कोंढाळा ग्रामपंचायत कार्यालयावर आज ग्रामवासियांनी मोर्चाच्या स्वरुपात धडक दिली. या मोर्चात घरकुलाचे लाभ देतांना ग्रामपंचाय स्तरावर भेदभाव करण्यात आला, असा आरोप भाजपा तालुकाध्यक्ष सुनिल पारधी यांनी केला.
 
gadchiroli
कोंढाळा ग्राम पंचायत अंतर्गत 20 ऑगस्ट रोजी ग्राम सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये घरकुलासाठी पात्र लाभार्थ्यांना वगळुन मर्जितील लोकांची घरकुल यादी प्रसिद्ध करण्यात आली. पंतप्रधान आवास योजने अंतर्गत सर्वांना घरकुल असे निकष असतांना ज्यांना खरोखरच घरकुलाची गरज आहे अश्या गरजु लोकांची नावे वगळणे म्हणजे जनतेशी भेदभाव करणे योग्य नाही. या गावात पिण्याच्या पाण्याची समश्या आहे. नळ जोळण्या पाहिजे त्या प्रमाणात झालेल्या नाही. नाल्यांचा उपसा न झाल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे. साथीच्या रोगांची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ग्राम पंचायत स्तरावर प्रयत्न होणे आवश्यक आहे, असे यावेळी सुनिल पारधी यांनी स्पष्ट केले.
 
या मोर्चात पवन खोब्रागडे, पंढरी नथाते, वासुदेव ठाकरे, भाष्कर पत्रे, दिगांबर भजनकार, रविन्द्र शेन्डे, अरुण सहारे, आनंदराव बेदरे, मनोहर मडावी, प्रभाकर चौधरी, दादाजी बुराडे, रोशनी पारधी यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.