नागपूर,
electricity-workers-welfare-fund वीज कामगार कल्याण निधीच्या सभासद कर्मचाऱ्याचा सेवाकाळात कोणत्याही कारणाने दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना देण्यात येणारी आर्थिक मदत २० हजारांवरून २५ हजार रुपये करण्यात आली आहे. ही वाढ १ ऑक्टोबर २०२६ पासून लागू होणार आहे.
वीज कामगार कल्याण निधीची स्थापना १० ऑगस्ट १९८६ रोजी झाली असून निर्मिती, पारेषण व वितरण कंपन्यांतील कामगार, अधिकारी आणि अभियंते या योजनेचे सभासद होऊ शकतात. सभासदत्वासाठी एकदाच ६५० रुपये भरावे लागतात. कर्मचारी सेवेतून सुखरूप निवृत्त झाल्यास त्यातील ५०० रुपये परत केले जातात. आतापर्यंत निधीतर्फे मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना १ कोटी ४० लाख ६० हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे.निधीची विश्वस्त मंडळाची बैठक व वार्षिक सर्वसाधारण सभा पुणे येथे अध्यक्ष सुभाष सावजी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपाध्यक्ष शंकरराव पहाडे, सचिव धनंजय इनामदार, कोषाध्यक्ष जयंत देशपांडे यांच्यासह विश्वस्त मंडळाचे सदस्य उपस्थित होते. अधिकाधिक वीज कर्मचाऱ्यांनी निधीचे सभासदत्व घ्यावे, असा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
सौजन्य:शंकर पहाडे,संपर्क मित्र