नागपूर,
National Sports Day राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त दादा रामचंद बाखरू सिंधू महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण विभागातर्फे आंतरमहाविद्यालयीन क्रीडा प्रश्नमंजुषा ‘स्पोर्ट्स मंथन २०२६ आयोजित करण्यात आली. विविध महाविद्यालयांच्या संघांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
स्पर्धेत हिस्लॉप महाविद्यालयाने प्रथम, तिरपुडे महाविद्यालयाने द्वितीय, तर एस.एफ.एस. महाविद्यालयाने तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्यांना एसएचव्हीएसचे महाविद्यालयीन व्यवहार सचिव अमित बाखरू व प्राचार्य डॉ. व्ही. एम. पेंडसे यांच्या हस्ते चषक व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.स्पर्धेची संकल्पना शारीरिक शिक्षण विभागप्रमुख डॉ. रामचंद्र राव यांची होती. कु. जसप्रीत कौर मुलतानी व सन्मित मेंजोगे यांनी सूत्रसंचालन केले.
सौजन्य:मिलिंद शिनखेडे,संपर्क मित्र