महिलांनो...अर्ध्या तिकिटाचा प्रवास करायचाय?

मग NCMC कार्ड जवळ ठेवा

    दिनांक :01-Sep-2026
Total Views |
मुंबई,
NCMC card has mandatory महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बसमधून सवलतीच्या दरात प्रवास करणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. १ सप्टेंबरपासून एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी NCMC कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे पात्र प्रवाशांकडे हे कार्ड नसल्यास त्यांना सवलतीच्या दरातील तिकीट मिळणार नाही. प्रवास करण्यापूर्वी संबंधित प्रवाशांनी NCMC कार्ड जवळ ठेवणे आवश्यक आहे. महामंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सुमारे १.११ कोटी प्रवाशांची NCMC कार्डसाठी नोंदणी करण्यात आली आहे.

ncmx
 
कार्डची नोंदणी आणि वितरणाची प्रक्रिया E-Bix Technologies Ltd या कंपनीकडे सोपवण्यात आली आहे. सवलतीचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने NCMC प्रणालीशी जोडली जात आहे. सध्या NCMC कार्डच्या प्रक्रियेत महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्यात आले आहे. सरकारी सवलतीसाठी पात्र असलेल्या इतर प्रवर्गांचाही पुढील टप्प्यात NCMC प्रणालीमध्ये समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे एसटीच्या सवलतीच्या प्रवासाचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांनी नव्या नियमाची नोंद घेऊन प्रवासापूर्वी NCMC कार्डाची खात्री करणे आवश्यक आहे.