सेवादूतांना राखी बांधून विद्यार्थ्यांची कृतज्ञता

    दिनांक :01-Sep-2026
Total Views |
नागपूर,
New English High School, Congress Nagar न्यू इंग्लिश हायस्कूल, काँग्रेसनगर येथे रक्षाबंधनानिमित्त विद्यार्थ्यांनी समाजासाठी सेवा देणाऱ्या विविध घटकांना राखी बांधून कृतज्ञता व्यक्त केली. महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी, शाळेचे वाहनचालक, रिक्षाचालक, श्रीकृष्ण हॉस्पिटलमधील डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी तसेच धंतोली पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना विद्यार्थ्यांनी राखी बांधली.
 


desh 
 
 
महाराष्ट्र इंजिनिअर कंपनीच्या एनसीसी आर्मी विंगमधील सैनिकांनाही विद्यार्थ्यांनी राखी बांधून त्यांच्या सेवेप्रती आदर व्यक्त केला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विद्यार्थ्यांनी शाळेतील झाडांनाही राखी बांधून त्यांच्या संरक्षणाचा संकल्प केला.या उपक्रमाचे आयोजन शाळेचे सकाळ विभागप्रमुख सतीश भोयर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. शिक्षकांनी सहकार्य केले.
सौजन्य:चित्रा देशपांडे,संपर्क मित्र