अनोळखी महिलेचा मृतदेह; चार-पाच दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा अंदाज

    दिनांक :01-Sep-2026
Total Views |
पुणे
pune hadapsar gliding centre हडपसरमधील काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ग्लायडिंग सेंटरच्या मोकळ्या आवारात एका अनोळखी महिलेचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत महिला साधारण ४० वर्षांची असून तिचा मृत्यू चार ते पाच दिवसांपूर्वी झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून, तिचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा तपास पोलीस करत आहेत.
 
 
pune hadapsar gliding centre
सोमवारी दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास ग्लायडिंग सेंटरच्या परिसरातून काही नागरिक जात असताना त्यांना उग्र वास आला. त्यामुळे त्यांनी परिसरात पाहणी केली असता एका महिलेचा मृतदेह पडलेला दिसून आला. नागरिकांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच काळेपडळ पोलीस ठाण्याचे अधिकारी तसेच गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला.
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अण्णासो बाबर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत आढळलेली महिला अंदाजे ४० वर्षांची आहे. प्राथमिक तपासातून तिचा मृत्यू चार ते पाच दिवसांपूर्वी झाला असावा, असा अंदाज आहे. मात्र, महिलेची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही. हा प्रकार हत्या आहे की अन्य कोणत्या कारणामुळे महिलेचा मृत्यू झाला, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. त्यासाठी परिसरातील बेपत्ता महिलांच्या तक्रारींचीही माहिती तपासली जात असून, मृत महिलेची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, पुणे जिल्ह्यात अशाच स्वरूपाची  pune hadapsar gliding centre आणखी एक धक्कादायक घटना नुकतीच समोर आली होती. शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा हद्दीत भीमा नदीच्या पात्रात ३० ते ३५ वर्षीय अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळला होता. नदीच्या प्रवाहात तरंगत असलेल्या या मृतदेहाचे हात-पाय दोरीने घट्ट बांधलेले होते. मृतदेह फुगलेल्या आणि छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला होता. हा मृतदेह साधारण महिनाभरापूर्वीचा असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता.
हडपसरमधील ग्लायडिंग सेंटरच्या आवारात आढळलेल्या महिलेच्या मृतदेहाची ओळख पटविण्यासह तिच्या मृत्यूमागील नेमके कारण शोधण्यासाठी काळेपडळ पोलीस आणि गुन्हे शाखेकडून कसून तपास सुरू आहे.