भारताला रशियाची महाऑफर!

S-500, Su-57सह 5 S-400 देणार

    दिनांक :01-Sep-2026
Total Views |
नवी दिल्ली.
Russia's mega-offer to India भारत-रशिया संरक्षण सहकार्याला नवे वळण देण्यासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारतासमोर मोठा प्रस्ताव ठेवला आहे. यात अत्याधुनिक S-500 Prometheus हवाई आणि क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली तसेच पाचव्या पिढीचे Su-57 Felon स्टेल्थ फायटर देण्याचा समावेश आहे. याशिवाय भारतीय हवाई दलाच्या निविदेला प्रतिसाद देताना रशियाने आणखी पाच S-400 Triumph प्रणाली देण्याची तयारी दर्शवली आहे.भारतीय सेवेत S-400ला 'सुदर्शन' म्हणून ओळखले जाते. ऑपरेशन सिंदूरदरम्यान या प्रणालीने पाकिस्तानकडून आलेले अनेक हवाई धोके रोखल्याचे अहवालात नमूद आहे. S-400च्या क्षेपणास्त्रांची मारक क्षमता 400 किलोमीटरपर्यंत आहे. पश्चिम हवाई कमांडचे प्रमुख एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांच्या माहितीनुसार, या प्रणालीने 314 किलोमीटर अंतरावरून पाकिस्तानी हवाई दलाचे एक टेहळणी विमान पाडले. 2018च्या करारातील पाच S-400पैकी चार भारताला मिळाल्या असून, पाचवी प्रणाली नोव्हेंबरपर्यंत मिळण्याची अपेक्षा आहे.
 
 

Russia
 
S-500च्या प्रस्तावासमोर भारताच्या स्वदेशी संरक्षण प्रकल्पांचाही मुद्दा आहे. भारताचा बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण कार्यक्रम आणि 'प्रोजेक्ट कुशा' सुरू असून, त्यामुळे S-500मुळे प्रत्यक्ष क्षमतेत किती भर पडेल, याचा विचार भारताला करावा लागणार आहे. दुसरीकडे, चीनकडे 500 हून अधिक J-20 "Mighty Dragon" स्टेल्थ फायटर असल्याचा अंदाज असून, पाकिस्तानला येत्या काही महिन्यांत चीनचे J-35 मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे AMCA उपलब्ध होईपर्यंत Su-57 हा तात्पुरता पर्याय ठरू शकतो.रशियाच्या प्रस्तावात S-500 आणि Su-57व्यतिरिक्त वोरोनेझ सामरिक पूर्व-सूचना रडार, भारतात S-500चे सह-उत्पादन, Sukhoi-57E, Kalibr क्रूझ क्षेपणास्त्रांनी सुसज्ज Kilo-श्रेणीच्या पाणबुड्या आणि भारतीय Su-30MKI ताफ्यासाठी Super Sukhoi अपग्रेडचाही समावेश आहे. मात्र, Su-57चा समावेश केल्यास भारतीय हवाई दलाच्या आधीच विविध प्रकारच्या लढाऊ विमानांच्या ताफ्यात आणखी एका विमानप्रकाराची भर पडेल. भारताने गेल्या दोन दशकांत संरक्षण पुरवठादारांमध्ये विविधता आणण्याचा प्रयत्न केला असून, अमेरिकन Javelin रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रे आणि अतिरिक्त 114 रा क्षेपणास्त्रे खरेदी करण्याचाही विचार सुरू आहे.