अभिषेक बॅनर्जी यांच्या पीएला पोलिसांनी नेले उचलून!

    दिनांक :10-Sep-2026
Total Views |
कोलकाता,
Abhishek Banerjee's PA arrested तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांचे वैयक्तिक सचिव सुमित रॉय यांना सीआयडीने गुरुवारी (१० सप्टेंबर) अटक केली. सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर सीआयडीने तात्काळ कारवाई केली. विशेष म्हणजे, रॉय यांना त्यांच्या स्वतःच्या घरातून नव्हे, तर अभिषेक बॅनर्जी यांच्या घरातून अटक करण्यात आली. त्यांच्यावरील ही कारवाई सालबोनी जमीन घोटाळ्याशी संबंधित आहे.सीआयडीने रॉय यांना अभिषेक बॅनर्जी यांच्या कालीघाट येथील निवासस्थानातून अटक केली. सालबोनी जमीन प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने रॉय यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. यापूर्वीच्या सुनावणीत, सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या अटकेला स्थगिती दिली होती, परंतु तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश दिले होते.
 

Abhishek Banerjee 
 
 
सुमित रॉय यांनी कलकत्ता उच्च न्यायालयाच्या ३ ऑगस्टच्या आदेशाला आव्हान दिले होते, ज्यामध्ये त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती, परंतु येथेही त्यांना निराशाच पदरी पडली आहे. सुमित रॉय यांना आता शुक्रवारी सकाळी मेदिनीपूर न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे. हे उल्लेखनीय आहे की, बंगाल सरकारने बुधवारी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, तृणमूल नेते अभिषेक बॅनर्जी यांचे वैयक्तिक सचिव सुमित रॉय यांनी एका बँक खात्यात मोठी रक्कम जमा केल्यामुळे साल्बोनी जमीन बळकावण्याच्या प्रकरणात त्यांची कोठडीतील चौकशी आवश्यक आहे.राज्याचे प्रतिनिधित्व करणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठाला सांगितले की, रॉय चौकशीदरम्यान माहिती टाळत होते.