चिनी रणगाडा फुटला, दोन सैनिकांचा जीव घेतला

बांगलादेशमध्ये सरावादरम्यान घडली घटना

    दिनांक :10-Sep-2026
Total Views |
ढाका,
Chinese tank blew up बांगलादेश सैन्याला सरावासाठी चिनी बनावटीच्या रणगाड्यांचा वापर करणे जीवावर बेतले. चट्टोग्राममधील हथाजारी फील्ड फायरिंग रेंजवर सुरू असलेल्या लष्करी सरावादरम्यान रणगाड्यातील गोळा फुटून भीषण स्फोट झाला. यात रणगाड्यावरील सैनिकांचा जागीच मृत्यू झाला तर एक कमांडिंग ऑफिसर गंभीर जखमी झाला आहे. जखमी अधिकाऱ्याला तातडीने हवाई रुग्णवाहिकेद्वारे ढाका येथील कंबाइंड मिलिटरी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. अबू बकर सिद्दीक आणि तसनीम रफायत अशी मृत जवानांची नावे आहेत. हथाजारी फील्ड फायरिंग रेंज, चट्टोग्राम. लष्कराच्या इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने या दुर्घटनेला आणि जीवितहानीला दुजोरा दिला आहे.
 
 
234354545456456
 
 
रणगाड्यातून गोळीबाराचा सराव सुरू असताना हा स्फोट झाला़ स्फाेट इतका तीव्र होता की रणगाड्यावरील जवान हवेत उंच उडाला. प्राथमिक अंदाजानुसार, निकृष्ट दर्जाचा दारुगोळा किंवा रणगाड्यातील तांत्रिक बिघाड या स्फोटाला कारणीभूत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चिनी शस्त्रास्त्रांची गुणवत्ता, सुरक्षा व्यवस्था आणि देखभालीवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. घटनेच्या कारणांचा शोध घेण्यासाठी उच्चस्तरीय तपास समिती स्थापन करण्यात आली आहे.
बांगलादेशी लष्कर अनेक वर्षांपासून चिनी बनावटीच्या मुख्य लढाऊ रणगाड्यांचा (टाईप ६९-आयआयजी/टाईप ५९) वापर करत आहे. हे रणगाडे जुन्या सोव्हिएत टी-५४/५५ मॉडेलवर आधारित असून, चीनच्या मदतीने त्यांना अपग्रेड करण्यात आले होते. यात १०५ मिमी मेन गन, आधुनिक फायर कंट्रोल सिस्टिम आणि एक्सप्लोसिव्ह रिॲक्टिव्ह आर्मर बसवण्यात आले होते. मात्र, या जुन्या तंत्रज्ञानाच्या आधारे चालणाऱ्या उपकरणांची विश्वासार्हता आणि सुरक्षितता आता पुन्हा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.