गजानन नगरात मुलांसाठी पर्यावरणपूरक मखर स्पर्धा

    दिनांक :10-Sep-2026
Total Views |
नागपूर
Eco-friendly Makhar Competition गजानन नगर संस्कार केंद्रांतर्गत तसेच शाखा ग्रुपतर्फे मुलांसाठी पर्यावरणपूरक वस्तूंपासून मखर तयार करण्याची स्पर्धा घेण्यात आली. मुलांच्या कलागुणांना व हस्तकलेला प्रोत्साहन मिळावे, तसेच त्यांना मोबाईलपासून काही काळ दूर ठेवून नैसर्गिक वस्तूंच्या माध्यमातून सर्जनशीलतेचा अनुभव मिळावा, हा स्पर्धेचा उद्देश होता.
 
 
makhr
 
पाला-पाचोळा, कागद, खर्डे तसेच इतर पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करून मुलांनी आकर्षक मखरे तयार केली. या उपक्रमासाठी गजानन नगर संस्कार केंद्राच्या प्रगती कुलकर्णी यांच्या सहकारी मैत्रिणी तसेच शाखा ग्रुपने सहकार्य केले.
सौजन्य :सुरेश चव्हारे,संपर्क मित्र