शेतकर्‍यांनी बैलाप्रती व्यक्त केली कृतज्ञता

दुष्काळाच्या सावटातही पोळा सण उत्साहात साजरा

    दिनांक :10-Sep-2026
Total Views |
वाशीम,
farmers कृषीप्रधान संस्कृतीच प्रतीक, बळीराजाचा सच्चा साथीदार असलेला पोळा सण शेतकर्‍यांनी उत्साहात साजरा करुन बैलाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली. येथील श्री बालाजी मंदीर, काटीवेश, चंडीकावेश, माहुरवेश, सिव्हील लाईन याठिकाणी पोळा भरविण्यात आला. वर्षभर शेतात राबणार्‍या सर्जा-राजाला सजवून शेतकर्‍यांनी वाजत गाजत मिरवणूका काढून बैलाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली.
 
 
pola
 
दुष्कळाच्या सावटातही बळीराजाचा आणि त्याच्या लाडया वृषभ राजाचा (बैलांचा) पोळा सण हा नेहमीच श्रद्धा, कृतज्ञता आणि आशेचा सण राहिला आहे. जेव्हा निसर्ग कोपतो आणि पाऊस हुलकावणी देतो, तेव्हा शेतकरी आर्थिक संकटात सापडतो. मात्र, तरीही वर्षाचे ३६५ दिवस शेतात घाम गाळणार्‍या आपल्या मुया सख्याप्रती, म्हणजेच बैलांप्रती असणारी कृतज्ञता कमी होत नाही. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून, हा सण देशपातहीवर पातळीवर उत्साहात साजरा करण्यात येतो. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणाबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला हा सण उत्साहात साजरा करण्यात आला. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण (आवतण) देण्यात येते. या दिवशी बैलाच्या खांद्याला हळद व तुपाने किंवा तेलाने शेकतात. याला खांद मळण म्हणतात.
 
 
पोळ्याच्या मुख्य दिवशी बैलांना चरायला नेतात. त्यानंतर नदी, नाल्यावर ओंघळ घालून घरी आणले जाते. त्यानंतर शिंगावर हिंगोळाचा लेप देण्यात आला. बेगड चमकीचा काग, शिंगावर घुंगराच्या पितळी छमब्या, नवीन नाथूट, मोहरकी, पट्टी चंगाळे, पिंतळी घंटी, वेसण, कासरा, अंगावर रंगाचे पट्टे, सजविलेली कपड्याची झूल, असा साज लावून बैलाजी पुजा अनेक ठिकाणी करण्यात आली. ज्यांच्याकडे बैल नाही, त्यांनी घरीच मातीच्या बैलाची पूजा करत पोळा सण साजरा केला.
 
 
बैलाची निगा राखणार्‍या बैलकर घरगड्यास नवीन कपडे देण्यात येतात. आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजश्रुंगार खरेदी करतात. बैल सजवितात व पोळ्यात भाग घेतात. गावाच्या सीमेजवळ (आखर) एक मोठे आंब्याच्या पानाचे तोरण करून बांधतात. त्या जवळ गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनया, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. या वेळेस पोळ्याची गीते म्हणायची पद्धत आहे. त्यानंतर, मानवाईक यांच्यातर्फे तोरण तोडले जाते व पोळा ’फुटतो’. नंतर बैल मारुतीच्या देवळात नेण्यात येतात. मग त्यांना घरी नेऊन ओवाळण्यात येते. बैल नेणार्‍यास ’बोजारा’ (पैसे) देण्यात येतात. असा हा पोळ्याचा सण आहे. पोळा उत्सवा दरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
 
बैलांची संख्या घटली
कृषी प्रधान संस्कृती असलेल्या आपल्या देशामध्ये बैलांना विशेष महत्त्व आहे. बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या कष्टाचे आभार मानण्यासाठी पोळा हा सण घराघरात साजरा केला जातो. पोळा या सणाला शेतकरी परिवारात एकुणच अत्यंत उत्साह असतो. शेतकर्‍यांच्या बांधावर बाराही महिने राबराब राबून शेतकर्‍यांच्या घरात धान्य संपदा साठविण्यात सर्वाधिक वाटा असणार्‍या बैलांची संख्या उत्तरोत्तर अनेक कारणांनी कमी होत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे.
 
 
वरुणराजा कोपला
गेल्या दिड महिन्यापासून जिल्ह्यात वरुण राजाने डोळे वटारले. त्यामुळे नदी, नाले देखल कोरडे आहेत. बैल धुण्यासाठी शेतकर्‍यांना पाणी शोधण्याची वेळ आली. पिके पुर्णतः करुन गेली. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीतीत आपल्यासोबत वर्षभर राबणार्‍या संख्या सोबत्याला सजविण्यसाठी महागडा साजश्रृंगार खरेदी करुन आकर्षक सजावट करुन बैलाला पोळ्या ठिकाणी आणले. दुष्काळातही पोळ्याया दिवशी शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर हास्य पाहायला मिळाले.