मुझफ्फरनगर,
Five killed in bus accident मुझफ्फरनगर जिल्ह्यात बुढाणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत भैसाना गावाजवळ बसने दोन दुचाकींना जबर धडक दिली. या भीषण अपघातात दोन्ही दुचाकींवरील पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये बागपत येथील वडील-मुलगी, जावई, मेहुणा व एका तरुणाचा समावेश आहे. पाेलिसांनुसार, भरधाव रोडवेज बसने समोरून येणाऱ्या दोन दुचाकींना धडक दिली. यात दोन्ही दुचाकींवरील पाच जण रस्त्यावर फेकल्या गेल्याने ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी रुग्णवाहिकेच्या मदतीने सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान पाचही जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पाेलिसांनी बसचालकाला ताब्यात घेत चाैकशी सुरू केली आहे़