भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्याची तारीख बदलली?

आता "या" तारखेला खेळाला जाणार सामना

    दिनांक :10-Sep-2026
Total Views |
नवी दिल्ली,
India vs Afghanistan date changeभारत आणि अफगाणिस्तान यांच्यात या महिन्यात तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. बीसीसीआयच्या वेळापत्रकानुसार, पहिला सामना १३ सप्टेंबर रोजी होणार होता, परंतु आता ही तारीख बदलत असल्याचे दिसत आहे. दिल्ली पोलिसांनीही या बदलाबाबत दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनला पत्र लिहिले आहे. आता असा अहवाल समोर आला आहे की, सामन्याचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे.
क्रिकबझच्या वृत्तानुसार, १३ सप्टेंबर रोजी होणारा टी२० सामना एक दिवसासाठी पुढे ढकलला जाऊ शकतो. ब्रिक्स शिखर परिषद ११ ते १३ सप्टेंबर दरम्यान दिल्लीत होणार आहे. हा सामना शिखर परिषदेच्या शेवटच्या दिवशी होईल. या सामन्यासाठी सुमारे २५,००० ते ३०,००० प्रेक्षक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यामुळे दोन्ही संघांना हाताळण्यासाठी दिल्ली पोलिसांवरील दबाव वाढेल.

aff 
दिल्ली पोलिसांनी लिहिलेल्या या पत्रात, स्टेडियमच्या आजूबाजूच्या परिसरातील वाहतुकीशी संबंधित विविध समस्यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. पत्रात म्हटले आहे की, डीडीयू मार्ग, बीएसझेड मार्ग, मिंटो रोड, कमला मार्केट आणि लगतच्या रस्त्यांवर आधीच वाहने आणि पादचाऱ्यांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे, पोलीस दलासाठी एकाच वेळी दोन गोष्टी सांभाळणे अत्यंत कठीण होऊ शकते.