श्रीमंतांच्या यादीत भारतीयांचा दबदबा वाढला

दोन नव्या भारतीयांची एंट्री

    दिनांक :10-Sep-2026
Total Views |
नवी दिल्ली
list-of-the-wealthy फोर्ब्सने सप्टेंबर २०२६ मधील जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. या यादीत टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांनी पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे. मस्क यांची संपत्ती तब्बल ६२७ अब्ज डॉलर इतकी असल्याचे या यादीत नमूद करण्यात आले आहे.

list of
या यादीत जेफ बेझोस २८८ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर सर्गेई ब्रिन २५६ अब्ज डॉलर संपत्तीसह तिसऱ्या स्थानावर आहेत. अमानसिओ ओर्टेगा २४८ अब्ज डॉलर संपत्तीसह आघाडीच्या श्रीमंतांमध्ये आहेत. मायकेल डेल यांची संपत्ती २४१ अब्ज डॉलर असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
तसेच, लॅरी पेज यांची संपत्ती २७७ अब्ज डॉलर, मार्क झुकरबर्ग यांची २१७ अब्ज डॉलर आणि लॅरी एलिसन यांची २१३ अब्ज डॉलर इतकी आहे. या सर्वांचा जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत समावेश आहे.
दरम्यान, या यादीचे विशेष आकर्षण म्हणजे भारतीय वंशाच्या अब्जाधीशांची झालेली एंट्री. अमेरिकेत स्थायिक भारतीय वंशाच्या अब्जाधीशांमध्ये १० जणांचा समावेश असून, यामध्ये दोन नव्या भारतीय अब्जाधीशांची भर पडली आहे.
नव्या भारतीय अब्जाधीशांमध्ये विनोद खोसला यांची संपत्ती १३.२ अब्ज डॉलर असून, जय चौधरी यांची संपत्ती ८.२ अब्ज डॉलर इतकी आहे. याशिवाय राकेश गंगवाल यांची संपत्ती ५.६ अब्ज डॉलर, रमेश टी. वाघदानी यांची ५.१ अब्ज डॉलर आणि कवितार्क राम श्रीराम यांची ४ अब्ज डॉलर संपत्ती आहे.
तसेच राजीव जैन यांची संपत्ती ३.९ अब्ज डॉलर, हेमंत तनेजा यांची ३.६ अब्ज डॉलर, तर संजय गजेंद्र आणि जितेंद्र मोहन यांची प्रत्येकी ३ अब्ज डॉलर संपत्ती आहे. ज्योती बसल यांची संपत्ती २.३ अब्ज डॉलर इतकी आहे.
फोर्ब्सच्या माहितीनुसार, अमेरिकेतील एकूण अब्जाधीशांपैकी सुमारे १७ टक्के अब्जाधीश हे स्थलांतरित प्रवासी आहेत. अमेरिकेतील १४४ अब्जाधीशांचे मूळ अमेरिका सोडून इतर विविध देशांमध्ये आहे. विशेष म्हणजे, या यादीत भारतातून सर्वाधिक २५ अब्जाधीश असल्याचे नमूद करण्यात आले आहे.