मोनालिसा बागल ‘काकुळ’मधून रहस्याच्या भोवऱ्यात

नोव्हेंबर 2026 मध्ये चित्रपटगृहात दाखल

    दिनांक :10-Sep-2026
Total Views |
मुंबई
monalisa bagal  अभिनेत्री मोनालिसा बागलने आजवर वेगवेगळ्या चित्रपटांतून उत्तमोत्तम भूमिका साकारल्या आहेत. आता ‘काकुळ’ या थरारक रहस्यपटात मोनालिसा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असून, नोव्हेंबर 2026 मध्ये हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.
 

monalisa bagal  
‘स्वप्निल गोगावले एंटरटेनमेंट ‘च्या बॅनरखाली ‘काकुळ’ या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा स्वप्निल विजया सहदेव गोगावले यांनी सांभाळली असून गौरी गोगावले, सोनाली लगड, सोमा दास आणि डॉ. सचिन भालेराव यांनी सहनिर्माते म्हणून बाजू सांभाळली आहे; तर दिग्दर्शन सूरज रघुनाथ पडवळ यांनी केले आहे. मोनालिसासह या चित्रपटात अक्षय टंकसाळे, संजय खापरे, यश डिंबळे, भूषण मंजुळे, आरती शिंदे, विवेक यादव, प्रकाश धिंडले हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटातील गाण्यांना उदय देशपांडे, पी. शंकरन आणि सिद्धांत बोरावके यांनी संगीतबद्ध केले असून छायांकनाची धुरा वीरधवल पाटील यांनी सांभाळली आहे.
रहस्य, भय आणि सामाजिक सूडभावना हे ‘काकुळ’ या चित्रपटाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. गावातील श्रीमंत आणि राजकीय वारसा लाभलेला संग्राम, त्याच्या आयुष्यात कल्पना या तरुणीचा प्रवेश झाल्यानंतर एकापाठोपाठ एक धक्कादायक घटना घडू लागतात. समाजातील स्त्रीविरोधी मानसिकता, पुरुषसत्ताक वृत्ती आणि वाईट कर्मांची फळे कशी भोगावी लागतात, या संकल्पनेवर ‘काकुळ’ हा चित्रपट बेतला आहे. प्रेक्षकांना विचार करायला लावणारा आणि थरारक अनुभव देणारा हा चित्रपट ठरेल. आजवरच्या मराठी रहस्यपट आणि भयपटांमध्ये ‘काकुळ’ नक्कीच वेगळा ठसा उमटवेल, यात शंका नाही. त्यामुळे या रहस्याचा उलगडा होण्यासाठी आता प्रेक्षकांना नोव्हेंबरची वाट पाहावी लागणार आहे.