घोराड येथे झाला एक गाव एक पोळा

आकर्षक नंदीबैलांनी वेधले लक्ष

    दिनांक :10-Sep-2026
Total Views |
सेलू,
one-village-one-pola तीर्थक्षेत्र घोराड येथे संत केजाजी महाराज व त्यांचे पुत्र संत नामदेव महाराज यांनी सुरू केलेल्या धार्मिक प्रथा परंपरा आजही जोपासल्या जातात. सहा हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या बहुतांश परिवार हा शेतकरी शेतमजूर आहे. शासनाने जाहीर करण्यापूर्वीच एक गाव एक पोळा या युक्तीप्रमाणे संत नामदेव महाराज समाधी मैदानावर १० सष्टेंबर रोजी पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विठ्ठल रुख्माई देवस्थान येथून सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास भजनी दिंडी निघाली. ही दिंडी बोरतीरावरून संत नामदेव महाराज समाधी मैदानावर येत रांगेत उभ्या असणार्या बैलजोड्यांसह गो माता मंदिराला पाच प्रदक्षिणा पूर्ण होताच संत नामदेव महाराज यांच्या समाधी समोर आरती झाली. त्यानंतर परंपरेनुसार मशाल पेटविण्यात येते अन् येथेच पोळ्याची सांगता झाली.
 
one-village-one-pola
 
या धार्मिक परंपरेला २०० वर्षे होत असून त्या आजही जोपासल्या जाते. बैल पोळ्याला कृषी मित्र बचत गटाच्या वतीने उत्कृष्ट सजावट असणाऱ्या बैल जोड्यांची निवड करून त्यांना शेती उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. देवस्थानचे पुजारी प्रमोद देवतारे यांचे हस्ते पोळ्यात काही बैलजोडी मालकाला दुपट्टा देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. मशाल पेटविण्याचा मान नक्षीने परिवाराला असून शशिकांत नक्षीने हे मशाल पेटवली त्यानंतर पोळा फुटला. यावर्षी निसर्ग कोपला असल्याने त्याचा परिणाम पोळ्यावर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु, आपल्या सर्जा राजाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी शेतकर्यांना एकच दिवस मिळत असल्याने शेतकऱ्याने पोळा उत्सवात कुठेही कसर ठेवली नाही. रितीरिवाजाप्रमाणे काल रात्री शेती मालकांनी बैलांचे खांदा मर्दन करीत उद्या जेवायाला येण्याचे निमंत्रण दिले होते. सालगड्यालाही नवीन वस्त्र दिले. आज सकाळीच बैलाना पुन्हा आंघोळ घालत रंगवण्यात आले. पुरणाच्या पोळीचे जेवन देऊन सायंकाळी पोळ्यात आण्यात आले. बैलांच्या अंगावर सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा ग्रामीण शब्दांतून निषेध करण्यात आला. गावातील झडत्याही यावेळी भाव खाऊन गेल्या.
 
नंदी पोळाही एकाच ठिकाणी
गावाचा विस्तार झाला असला तरी नंदी पोळा आजही एकाच ठिकाणी साजरा केला जातो. विठ्ठल रुख्माई देवस्थान समोर हा पोळा भरतो. ढोल ताश्याच्या गजरात नंदी देवस्थान समोर येतात. अडीच हजारांहून अधिक नंदी असतात. सर्वांना कूपन दिले जाते लकी ड्रा व उत्कृष्ट नदी व वेशभूषा पाहून यांना ज्ञानदीप भजन मंडळाच्या वतीने बक्षिसं देण्यात येते.