रामनगरात श्रावण महोत्सव उत्साहात

    दिनांक :10-Sep-2026
Total Views |
नागपूर ,
Parjan Foundation परिजन फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. परिणिता फुके यांच्या वतीने श्रीराम सभागृह, रामनगर येथे आयोजित ‘श्रावण महोत्सव’ उत्साहपूर्ण आणि आनंदमय वातावरणात संपन्न झाला.
 
mh
 
 
 
कार्यक्रमाला ज्योत्सना उगेमुगे, . सोनाली वाघमारे, नगरसेवक योगेश पाचपोर, रविजी वाघमारे, नगरसेविका रुतिका मसराम, . होले आणि कल्याणी पाचपोर यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते मंगलागौरीचे पूजन व आरती करण्यात आली.श्रावणाच्या मंगलमय पर्वात महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाने कार्यक्रमाला उत्सवी रंगत आली. नात्यांमध्ये आपुलकी, आनंद आणि उत्साह निर्माण करणारा हा सोहळा उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला.
सौजन्य :रवी वाघमारे,संपर्क मित्र