पोरवाल कॉलेजचे बुद्धिबळपटू जिल्हास्तरावर!

    दिनांक :10-Sep-2026
Total Views |
नागपूर,
porwal college येथील एस. के. पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत दमदार कामगिरी करत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या वतीने ७ सप्टेंबर २०२६ रोजी मेरी पोस्ट पिन अकॅडमी स्कूल, खासाळा मसाला, कामठी रोड येथे तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विविध शाळांमधील एकूण १६ विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वयोगटांत सहभाग घेतला. एस. के. पोरवाल महाविद्यालयाची विद्यार्थिनी रुनाली नागपुरे (वय १९) हिने मुलींच्या गटात, तर यथार्थ मेश्राम (वय १९) याने मुलांच्या गटात सर्व पाच फेऱ्या यशस्वीपणे पूर्ण करत जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रवेश मिळवला.
 
porwal college
 
या विद्यार्थ्यांच्या यशस्वी कामगिरीसाठी महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. मल्लिका नागपुरे यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स्वप्निल दाहात तसर, उपप्राचार्य व्ही. बी. वंजारी, पर्यवेक्षक नरेंद्र मेंढे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
सौजन्य: डॉ. सुधीर अग्रवाल, संपर्क मित्र