ट्रम्प-पुतिन यांच्यात चर्चा

    दिनांक :10-Sep-2026
Total Views |
मॉस्को,
talks between trump and putin अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. या संभाषणादरम्यान, ट्रम्प यांनी युक्रेन युद्ध लवकरात लवकर संपवण्यावर चर्चा केली. रशियाच्या राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय असलेल्या क्रेमलिनने ट्रम्प यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. त्यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, ट्रम्प यांनी पुतिन यांच्यासोबत दूरध्वनीवरून एक ताच चर्चा केली.
 
 
talks between trump and putin
 
अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर यांच्या मॉस्को आणि कीव्ह येथील अलीकडील दौऱ्यानंतर हे संभाषण झाले. पुतिन आणि ट्रम्प यांनी अमेरिकी दूतांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. युद्ध संपवण्यासाठी अमेरिका कोणती भूमिका बजावू शकते हे पुतिन यांनी ट्रम्प यांना समजावून सांगितले आणि त्यांना सध्याच्या परिस्थितीची माहिती दिली. ट्रम्प म्हणाले की, युद्ध संपल्याने दोन्ही देशांमधील व्यापार आणि आर्थिक संबंधांनाही मोठा फायदा होईल. दूरध्वनी संभाषणादरम्यान, पुतिन यांनी सांगितले की, रशियाचा युरोपविरुद्ध कोणताही आक्रमक हेतू नाही. रशिया आपली लष्करी उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी कटिबद्ध आहे.