नवी दिल्ली,
temperatures are also rising on saffron केशराच्या काही काड्या खीर, बिर्याणी किंवा एक कप दुधाची चव आणि रूप पूर्णपणे बदतात. पण केसरच्या पिकासाठी योग्य वेळी योग्य हवामान असणे गरजेचे आहे. केशर शेतीतून शतकानुशतके भारताचा अत्यंत मौल्यवान असा मसाला उत्पादित होत आला आहे, परंतु या पिकावरही आता तापमान वाढीचा परिणाम हाेतो आहे.
बदलते तापमान आणि पर्जन्यमान, पाण्याची कमतरता, आकुंचन पावणारे लागवडीखालील क्षेत्र आणि शेतीपद्धतींशी संबंधित आव्हाने यांचा त्याला सतत सामना करावा लागत आहे. हंगामाच्या अचूक चक्रावर अत्यंत अवलंबून असलेल्या पिकासाठी, हवामानातील अनिश्चितता हे आव्हान अधिक कठीण होत आहेत आणि जागतिक संकटाचे रूपांतर चिंतेत झाले आहे. शरद ऋतूमध्ये फुलणाऱ्या ‘क्रोकस सॅटिव्हस’ फुलाच्या लाल परागकोशांपासून केशर मिळते. त्यामुळे, फुलोरा येण्यापूर्वीच्या आठवड्यांतील हवामान विशेष महत्त्वाचे ठरते. केशराची वाढ आणि त्याला येणारी फुले यांचा तापमान व पाण्याची उपलब्धता यांच्याशी जवळचा संबंध आहे, असे संशोधनात आढळून आले.
सप्टेंबरमध्ये दिवसाचे तापमान सुमारे २३ ते २५ अंशसेल्सिअस असणे ‘कॉर्म’च्या (कंदाच्या) अंकुरणासाठी महत्त्वाचे असते, तर दिवसाचे तापमान सुमारे १७ अंशसेल्सिअसपर्यंत खाली आल्यावर आणि रात्रीचे तापमान १० अंशसेल्सिअसच्या आसपास असताना फुलोरा येण्यास सुरुवात होते. स्वाभाविकच, पावसाचे प्रमाणही तितकेच महत्त्वाचे आहे. पाम्पोरमधील केशर लागवडीबाबत २०२४ मध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासात पावसाचे प्रमाण अति असो वा अपुरे, दोन्ही परिस्थितींत उत्पादनाचे नुकसान होऊ शकते, तसेच पाणी उपलब्ध होण्याच्या वेळेलाही महत्त्व असते, असे आढळून आले. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, केशराला केवळ पाऊस किंवा थंडीचीच गरज नसते, तर ती योग्य वेळी मिळणे आवश्यक असते. जम्मू आणि काश्मीरमधील केशर लागवडीबाबतच्या अभ्यासांनी तापमान आणि पर्जन्यमानातील बदलांचा संबंध या पिकाच्या उत्पादकतेशी जोडला आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे महिने विशेष महत्त्वाचे आहेत.
केशराची संवेदनशीलता संशोधनातून अधोरेखित
या काळात अपुऱ्या पावसामुळे कोंब येण्यास आणि फुले येण्यास विलंब होऊ शकतो. तापमान आणि पर्जन्यमानातील बदलांबाबत केशराची असलेली संवेदनशीलताही संशोधनातून अधोरेखित झाली आहे. याचा ताण उत्पादनावर स्पष्टपणे दिसून येतो. आकडेवारीनुसार, काश्मीरमधील केशराचे उत्पादन २०१०-११ मधील आठ टनांवरून घटून २०२३-२४ मध्ये २.६ टनांवर आले आहे. भारतातील एकूण केशरापैकी सुमारे ९० टक्के उत्पादन काश्मीरमधून होते. त्यामुळे या पिकासाठी तेथील बदलत्या हवामानाचा विषय विशेष महत्त्वाचा ठरतो.