तिबेट पुन्हा हादरले; ३.७ तीव्रतेचा भूकंप

    दिनांक :11-Sep-2026
Total Views |
नवी दिल्ली,
3.7 magnitude earthquake in Tibet भारताच्या शेजारील तिबेटमध्ये शुक्रवारी पहाटे पुन्हा भूकंपाचा धक्का जाणवला. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, पहाटे ४ वाजून २ मिनिटांनी झालेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.७ इतकी नोंदवण्यात आली. या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली ३० किलोमीटर खोलीवर होता. अलीकडच्या काळात विविध भागांमध्ये सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
 

3455667 
 
तिबेटमध्ये यापूर्वी ८ सप्टेंबर रोजीही भूकंप झाला होता. त्यावेळी भूकंपाची तीव्रता ५.३ इतकी होती आणि त्याचे धक्के नेपाळमध्येही जाणवले होते. त्यामुळे शुक्रवारी पुन्हा तिबेटमध्ये भूकंपाची नोंद झाल्याने परिसरातील भूकंपाच्या हालचालींकडे लक्ष लागले आहे. शुक्रवारी झालेल्या ३.७ तीव्रतेच्या भूकंपामुळे कोणते नुकसान झाले किंवा जीवितहानी झाली का, याबाबतची माहिती समोर आलेली नाही.
 
दरम्यान, शुक्रवारी सकाळी भारतातील पश्चिम बंगालमध्येही भूकंपाची नोंद झाली. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानुसार, सकाळी ६ वाजून ५६ मिनिटांनी अलीद्वारपूर परिसरात भूकंप झाला. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ३ इतकी होती, तर केंद्रबिंदू जमिनीखाली ९ किलोमीटर खोलीवर होता. याच दिवशी अफगाणिस्तानमध्येही भूकंपाचा धक्का जाणवला. तेथील भूकंपाची तीव्रता ३.५ इतकी नोंदवण्यात आली असून त्याचा केंद्रबिंदू जमिनीखाली तब्बल १६३ किलोमीटर खोलीवर होता.