वाघाचा एआय फोटो बनविणाऱ्यावर गुन्हा दाखल

मोठ्या प्रमाणात केला होता व्हायरल, शिरजगाव पोलिसांची कारवाई

    दिनांक :11-Sep-2026
Total Views |
शिरसगाव कसबा
ai generated tiger photo येथील पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम देऊरवाडा येथील इसमाने एआयच्या माध्यमातून मौजे देऊरवाडा व देवापूर येथे वाघ दिसल्याचा फोटो व्हायरल केला होता. हा फोटो प्रसारित होताच सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी शेख समीर शेख रा. देऊरवाडा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
ai image
 
सदर प्रसारित झालेल्या फोटोमुळे सर्वांना सावध करण्याकरिता पोलिस स्टेशनकडून सूचना देण्यात आल्या होत्या. वनपरिक्षेत्राचे वनपाल प्रदीप तलखंडकर व शिरसगाव पोलिस स्टेशनचे कर्मचारी यांनी संयुक्तपणे मोहीम राबवून घटनास्थळाची पाहणी केली असता वाघ असल्याच्या कोणत्याही खुणा परिसरात दिसून आल्या नाही. तेव्हा फोटो व्हायरल करणाऱ्याकडे अधीक चौकशी केली असता सदर इसमाने सत्य सांगण्यास टाळाटाळ केली. पोलिसांनी हिसका दाखवताच त्याने फोटो व्हायरल केल्याची कबुली दिली. वन विभागाच्या लेखी तक्रारीवरून शिरसगाव कसबा पोलिस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली.
 
भीतीमुळे शुक्रवारी अनेक शेतमजूर व शेतकरी शेतावर गेले नाही. शेतातील सर्व कामधंदे बंद होते. अशा प्रकारचा प्रयत्न पुन्हा कोणी करू नये व यंत्रणेला त्रस्त करू नये याकरीत शेख समीर याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी शेतकरी व शेतमजुरांनी केली आहे.