नागपूर,
BEYOND BGE NAGPURबिझनेस ग्रोथ कोच स्वस्तिक जैन यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय ‘BEYOND BGE – A Business Growth Program’ या व्यवसायवृद्धी कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली. या कार्यक्रमात मॅन्युफॅक्चरिंग, कन्स्ट्रक्शन, रिअल इस्टेट, आर्किटेक्चर, ट्रेडिंग आणि डिजिटल मार्केटिंग यांसह विविध क्षेत्रांतील ८० हून अधिक व्यवसाय मालकांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमात श्री स्टील कास्टिंगचे व्यवस्थापकीय संचालक मनोज माहेश्वरी, संचालक लक्ष्य माहेश्वरी, रचना कन्स्ट्रक्शनच्या कार्यकारी संचालिका निलिमा दिओटे, संचालक रौनक दिओटे आणि लोंडे ज्वेलर्सचे संचालक राजेश लोंडे यांनी उद्योजकांशी संवाद साधत आपले अनुभव आणि व्यावसायिक वाटचालीतील महत्त्वाचे पैलू उपस्थितांसमोर मांडले.
व्यवसायातील कॅश फ्लोशी संबंधित अडचणी दूर करण्यासाठी योग्य ग्राहकाची निवड आणि प्रभावी Collection Method यावर कार्यक्रमात विशेष भर देण्यात आला. यासाठी ‘CASH LOCK System’च्या माध्यमातून व्यवसायातील रोख प्रवाह अधिक प्रभावीपणे व्यवस्थापित करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरलेल्या‘Business Owners Talk Show’मध्ये ५० कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल उभारलेल्या फर्स्ट जनरेशन उद्योजकांनी सहभाग घेतला. त्यांनी व्यवसाय उभारणीतील अनुभव, आव्हाने आणि त्यावर केलेल्या उपाययोजनांची माहिती सहभागी उद्योजकांसोबत शेअर केली.
या कार्यक्रमामुळे विविध क्षेत्रांतील व्यवसाय मालकांना व्यावहारिक व्यावसायिक ज्ञान मिळण्यासोबतच यशस्वी उद्योजकांच्या प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची आणि अनुभवी व्यावसायिकांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली.