भागलपूर,
bjp leader shot dead भागलपूरमधील बाबरगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत दाेन हल्लेखाेरांनी दिवसाढवळ्या भाजपा नेत्याची गाेळ्या झाडून हत्या केली. उमा भूषण तांती, असे मृत नेत्याचे नाव आहे़ पाेलिसांनुसार, मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात गुन्हेगारांनी अगदी जवळून त्यांच्या डोक्याच्या मागच्या बाजूला दोन गोळ्या झाडल्या त्यानंतर शस्त्रे उगारून हल्लेखाेर घटनास्थळावरून पसार झाले घटनेनंतर कुटुंबीय आणि स्थानिकांनी रक्ताने माखलेल्या उमा भूषण यांना उपचारासाठी जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
माहिती मिळताच, भाजपा आमदार रोहित पांडे तत्काळ रुग्णालयात पोहोचले. त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी बोलून मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी केली. ही हत्या काली मंदिराचे बांधकाम आणि अध्यक्षपदावरून झालेल्या वादातून झाल्याचे सांगण्यात येत आहे़ कुटुंबीयांनी या हत्येसाठी माजी नगरसेवक आणि भाजपा नेते शशी मोदी आणि त्यांचे भाचे, कृष्णा मोदी यांना जबाबदार धरले आहे. पाेलिस हल्लेखाेरांचा शाेध घेत आहे़