वर्धा,
cctv cameras जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्वच ९०५ शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. विद्यार्थी तिसर्या डोळ्याच्या निगराणीत विद्याथ्र्यांच्या सर्वच हालचालीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. विद्याथ्र्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य खबरदारी घेतल्या जात असल्याने पालकही निश्चित झाले आहे.
जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ९०५ शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी निधीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाचे माध्यमातून सरकारकडे पाठविण्यात आला. राज्यभरातील शाळांना निधी देणे शक्य नसल्याने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. सन २०२४-२०२५ मध्ये १ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी जिल्हा परिषदेला देण्यात आला. या निधीतून ४०० शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे तर सन २०२५-२०२६ मध्ये ५०० शाळांना कॅमेरे लावण्यासाठी २ कोटींचा निधी देण्यात आला होता.
परंतु, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने उर्वरित ५ शाळांना निधी उपलबध करीत सर्वच ९०५ शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील सर्व ९०५ शाळा आता सीसीटीव्ही कॅमेर्याच्या निगराणीखाली आल्या आहेत. या निर्णयामुळे शाळेतील प्रत्येक हालचालीवर आता तिसर्या डोळ्याची नजर ठेवली जात आहे. जिल्ह्यातील शाळांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडल्याच्या घटना समोर आल्या नाहीत. परंतु राज्यभरात समोर येत असलेल्या घटनेच्या दृष्टीने सुरक्षेच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले आहे. जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन यांनी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प होती घेतला होता.