अमरावती जिल्हा परिषदेत शिरला कोल्हा

वनविभागाच्या पथकाची तारांबळ

    दिनांक :11-Sep-2026
Total Views |
अमरावती
fox enters amravati zilla parishad जिल्हा परिषदेच्या आवारात शुक्रवारी सकाळी एक कोल्हा शिरला. कर्मचाऱ्यांची चाहूल लागताच कोल्हा परिसरातील भांडारगृहात शिरला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे काही काळ कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळ उडाला.
 
fox
सकाळी साडेनऊच्या सुमारास काही कर्मचाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षाच्या दिशेने कोल्हा धावताना दिसला. त्यानंतर तो भांडारगृहात शिरला. घटनेची माहिती जिल्हा परिषदेचे ध्वज रक्षक उत्तम डोंगरे यांनी वनविभागाला दिली. माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे बचाव पथक जिल्हा परिषदेत दाखल झाले. भांडारगृहाचे दार बंद करून पथकाने कोल्ह्याचा शोध सुरू केला. खोलीतील काही साहित्य बाजूला करण्यात आले.
 
सुमारे तासभर प्रयत्न केल्यानंतर वनविभागाच्या पथकाला कोल्ह्याला पकडण्यात यश आले. अमोल गावनेर यांच्या नेतृत्वाखाली अक्षय तांबट, मुकेश गवई, शुभम गायकवाड, मुकेश ठाकरे यांच्यासह वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. कोल्ह्याला सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आले.