गिरीश उपाध्याय क्रीडारत्नने सन्मानित

    दिनांक :11-Sep-2026
Total Views |
वर्धा,
girish upadhyay येथील जागतिक जलतरणपटू गिरीश उपाध्याय यांना क्रीडा देवळे येथे आयोजित एका शानदार कार्यक्रमात रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.गिरीश उपाध्याय यांनी आंतरराष्ट्रीय इटली (रिचौनी) २०१२ व रशिया (कझान) येथे १० मीटर हायबोर्डवरून ६ प्रकारे सूर केली व २ ब्रांझ मेडल भारताचे नाव संपूर्ण विश्वात केले.
 
 
girish upadhyay
 
२०२१ ला नेपाळ येथे आयोजित आंतरराष्ट्रीय स्पर्धेत १ सुवर्णपदक, राष्ट्रीय व राज्यस्तरीय ऑनलाइन स्पर्धेत सागरी साहसी ओपन वॉटर ड्रायव्हींग, स्विमींग, सायकलींग, योगा, शुटींग, बॅडमिंटन आदींमध्ये २७१ पदकं त्यांनी पटकाविले आहे. त्यांनी वर्धेत ३ वेळा नगर परिषदतर्फे जलतरण तलाव येथे राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा घेतली. ते वर्धा शटल बॅडमिंटन असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांच्या या खेळाडूवृत्तीची दखल घेत त्यांनी क्रीडारत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळ आयोजक मोहन अग्रवाल, सचिन वैद्य व सुधाकर सुरकार यांच्या हस्ते सर्वांचा सन्मान करण्यात आला.