नागपूर,
marbat festival नागपूर शहराची अतिशय जुनी, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा असणारा 'मारबत महोत्सवाला यावर्षी प्रथमच बॉलीबुडमधील कलावंत व विविध देशातील वाणिज्य राजदूतांनी हजेरी लावल्याने जागतिक स्तरावर ओळख प्राप्त झाली आहे. तऱ्हाने तेली समाजतर्फे आयोजित पिवळी मारबत व काली मारबत उत्सव समितीच्या वतीने आयोजित काळी मारबत आणि विविध बडग्या आयोजन समितीतर्फे आयोजित बडग्या या नागपूरच्या लोक परंपरेतील या महोत्सवाचा ढोल-ताशांच्या गजरात आनंद व आस्वाद या पाहुण्यांनी घेतला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे अर्थ व नियोजन राज्यमंत्री आशीष जयस्वाल, आमदार कृष्णा खोपडे, आमदार मोहन मते, आमदार प्रवीण दटके, आमदार डॉ. राजीव पोतदार, महापौर निता ठाकरे, फ्रांसचे वाणिज्यदूत पॅट्रीक लेवेरीनो, नॉर्वेच्या वाणिज्य दूत मोनिका निगलगार्ड, फिनलँडच्या वाणिज्यदूत पेट्रा थीमन, प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफ, सुप्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई, प्रसिद्ध क्रिकेटपटू उमेश यादव, अभिनेता अंकुश चौधरी, उपमहापौर लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे, सत्ता पक्षनेता नरेंद्र (बाल्या) बोरकर, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आयुक्त डॉ. विपीन, ज्येष्ठ नगरसेविका आभा पांडे, क्रीडा समितीच्या सभापती सौ. दर्शना धवड, माजी महापौर दयाशंकर तिवारी, माजी महापौर अर्चना डेहनकर यांच्यासह प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, ग्राफीक डिझायनर विवेक रानडे यांनी या महोत्सवाला हजेरी लावली.
मुख्यमंत्री, महापौर यांच्यासह फ्रांस, नॉर्वे, व फिनलँड देशाचे वाणिज्य राजदूतांनी पिवळी मारबतच्या मिरवणुकीवर पुष्प वर्षांव केला. यावेळी चितार ओळी चौकात जमलेल्या हजारो संख्येच्या नागरिकांनी जल्लोष करून इडा पिडा घेऊन जा गे... मारबत... या घोषणेचा गजर केला.