आंतरराष्ट्रीय व्हॉलिबॉलपटू माहेश्वरीचा क्रीडा भारतीतर्फे सत्कार

    दिनांक :11-Sep-2026
Total Views |
वर्धा,
international volleyball चीन येथे आयोजित जागतिक शालेय व्हॉलिबॉल स्पर्धेत भारतीय संघाकडून चमकदार कामगिरी करून देशाचे नाव उज्ज्वल करणार्या आंजी मोठी येथील माहेश्वरी प्रशांत भावरकर हिचा क्रीडा भारती वर्धा शाखेतर्फे सत्कार करण्यात आला.
 
international volleyball
 
यावेळी क्रीडा भारती पश्चिम क्षेत्राचे सहसंयोजक रमेश प्रजापती (अहमदाबाद, गुजरात) यांच्या हस्ते माहेश्वरीला सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांची प्रमुख उपस्थिती होती. खेळाडूच्या यशामागे त्याचे प्रशिक्षक आणि पालकांचे योगदान मोलाचे असते ही भावना जपत क्रीडा भारतीतर्फे माहेश्वरीचे प्रशिक्षक पराग काळे यांना द्रोणाचार्य सन्मान तर तिच्या आईला जिजामाता सन्मान देऊन विशेष सन्मानित करण्यात आले. यावेळी क्रीडा भारतीचे जिल्हा अध्यक्ष हरीश गांधी, सारंग परिमळ, प्रवीण खवशी, अमित प्रसाद, स्वप्नील पांडे, सुशील लोहिया, योगेश केळकर आदींसह आंजी परिसरातील क्रीडाप्रेमी व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.